Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता
Read More
Elon Musk यांच्या SpaceX या कंपनीने हाती घेतलेल्या Starship मोहीमेला यश आले असून,अंतराळ संशोधनामध्ये नवा विक्रम रचला गेला आहे. मोहीमेचा हा प्रवास जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून.
(Elon musk) स्पेस एक्सचे पोलारिस डॉन क्रू रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगास कोस्टवर दुपारी १.०६ वाजता उतरले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग ताशी २७ हजार किमी होता. हवेशी संपर्क झाल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान १ हजार, ९०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आपल्या सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता या प्रकरणी निशाण्यावर आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली. ट्रुडो यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे.
ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांकडून मासिक शुल्क घेण्याचा मानस आहे. प्रसारित केलेल्या ट्विटचा मजकूर बदलणे, ट्विटरवर मुक्तचर्चेला चालना देताना कंपनीचे ‘अल्गोरिदम’ उघड करून त्यात पारदर्शकता आणणे, अशा अनेक सुधारणा एलॉन मस्कच्या अजेंड्यावर आहेत.
‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क आता ‘ट्विटर’वर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणार, हे निश्चित! हा करार जरी भविष्यात आकाराला येणार असला तरी या व्यावसायिक समीकरणामुळे ‘ट्विटर’वरील विचारस्वातंत्र्याची गणिते बदलतील का? ‘ट्विटर’च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पक्षी आता समाजमाध्यमांच्या डिजिटल विश्वास मुक्त विहार करेल का? यांसारख्या प्रश्नांचा उहापोह करणारा हा लेख...
रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर चारही बाजूंनी चढाई केली आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची संपर्क यंत्रणा बेचिराख झाली होती. याच वेळी युक्रेनच्या डिजिटल टान्सफॉर्मशन मंत्र्यांनी स्वतः ट्विट करून एलोन मस्क यांना मदतीची विनंती केली होती
एक असा व्यक्ती, ज्याने भविष्य वर्तमानात साकारण्याची हिंमत केली आणि खरोखरी ते सत्यातही उतरवले, असा असामान्य माणूस आता जगभरात पाय रोवण्याची सुरुवात भारतापासून करतोय, हे सर्वस्वी अभिमानास्पद आहे.
‘कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचले, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित!’, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती