मुंबई : नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल)च्या सामाजिक उपक्रमण धारावी सोशल मिशन (डीएसएम) आयोजित एसी दुरुस्ती आणि किरकोळ विक्री अभ्यासक्रमांमधून १०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणार्थीना मुंबईतील जेव्हीएलआर येथील एईएमआय सभागृहात ( Convocation Ceremony ) प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे अभ्यासक्रम धारावीतील तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी परिपूर्ण करण्यासाठी, नवीन संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
Read More
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी(एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा ७३वा वार्षिक दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), चर्चगेट, मुंबई येथे साजरा झाला. या ७३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्येल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी भूषविले.
नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली.
नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हरसिटी उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रगतीबरोबरच . वनवासी लोकसंख्या असलेल्या या भागाच्या विकासावरही विद्यापीठ विशेष भर देत आहे हे पाहून आनंद होत आहे. मेघालयातील शिलांग येथे नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या (एनईएचयू) २६ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी आज संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन पोशाखात बदल. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये पुणेरी पगडी घालण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी केली