‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, अशी टीका आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. नाना पाटोले यांच्या वक्तव्याचा समाचार त्यांनी घेतला.
Read More
अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
अभिनेत्री किआरा अडवाणी अभिनेता रामचरण सोबत आगामी दाक्षिणात्य चित्रपट 'गेम चेंजर' मध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. देशभरातून ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रामचरण आणि किआरा बऱ्याच ठिकाणी फिरत असून अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पण नेमकं काय झालं आहे कियाराला जाणून घेऊयात...
जगभरात नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीचे करोडो चाहते आहेत. पण आता नेटफ्लिक्सच्या चाहत्यांना आवडता कंटेन्ट पाहण्यासाठी थोडे अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याच्या निवडक प्लॅनची किंमत वाढू शकते असा अंदाज मांडला जात आहे. स्लॅशडॉटने दिलेल्या अहवालानुसार, जेफरीज नावाच्या एका संशोधन संस्थेने दावा करण्यात आला आहे की, Netflix डिसेंबर २०२४ पर्यंत त्याच्या मानक आणि जाहिरात-समर्थित प्लॅनची किंमत वाढीची घोषणा करू शकते.
२०२१ रोजी आलेली 'स्क्वीड गेम' ही वेबसीरिज विशेष गाजली होती. एकीकडे संपूर्ण जग महामारीचा सामना करत होतं आणि दुसरीकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी 'स्क्वीड गेम' या वेबसीरिजने मनोरंजनाचा बूस्टर डोस देण्याचं काम केलं होत. जगभरात या वेब सीरीजचे चाहते आहेत आणि दुसरा सीझन कधी येणार याची ते वाट पाहात होते. आता प्रतीक्षा संपली असून नुकताच 'स्क्वीड गेम 2'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिलीज कधी होणार याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.
कचर्यासारख्या सहज दुर्लक्ष होणार्या विषयाचे गांभीर्य ओळखून, कचरानिर्मिती कमी करण्यासाठी, जनसाक्षरतेचा ध्यास घेतलेल्या गार्गी गीध यांच्याविषयी...
२०२४ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ‘पद्मश्री’ रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ हे पुस्तक दि. २० फेब्रुवारीला ‘विवेक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. देशात झालेले वैचारिक परिवर्तन म्हणजेच मोदींनी केलेला हा ‘गेम चेंज’ आहे. तो समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.त्यानिमित्ताने या पुस्तकात काय मांडले आहे, हे समजण्यासाठी पुस्तकाच्या भूमिकेचा संक्षिप्त भाग येथे देत आहोत.
पॅरा अॅथलीट नारायण ठाकूरने दि. २५ ऑक्टोबर रोजी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
भारतात लोकप्रिय झालेल्या पब्जी गेम अॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. याविषयी गुगल आणि अॅपलला बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स इंडिया म्हणजेच BGBI या गेमवर बंदी घातली आहे.
आज रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत १ डॉलर = ७९.७५ रुपये इतकी आहे. काही महिन्यांपूर्वी ७२ रुपये प्रती डॉलर असणारा रुपया काहीसा घसरला आहे. रशिया-युक्रेन युद्धपरिस्थिती, वाढता जागतिक महागाई दर, काही देशांमध्ये आलेलं अन्नसंकट या सगळ्यामुळे रशिया सोडला, तर इतर बहुतेक देशांच्या चलनात डॉलरच्या तुलनेत घसरण झाली आहे. काही चलनांच्या तुलनेत रुपया वधारला. २०२१ मध्ये एक युरोची किंमत ८७ रुपये होती. ती आता ८० रुपये आहे. २०२१ मध्ये एक पौंडाची किंमत १०१ रुपये होती ती आता ९४ रुपये आहे. २०२१ मध्ये एक फ्रेंच फ्रँकची किंमत १३.६ र
"माविआकडे १७२ मतं असताना आमचा उमेदवार पराभूत झाला, गेम प्लॅन मध्ये आम्ही अपयशी ठरलो", अशी प्रतिक्रिया राज्यसभेच्या निकालावर नाना पाटोले यांनी दिली. "राज्यसभा निवडणुकीमध्ये आम्हाला एक मत जास्त मिळाले, ते कुणाचे मिळाले याचा शोध घेतोय", अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
गेम डेव्हलपर योझू कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिन ची यांच्या हत्येने खळबळ
प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या साहो या चित्रपटाचे वेड प्रेक्षकांवर असतानाच नुकतेच त्यावरील एक गेम देखील लॉन्च करत असल्याचे साहोची निर्मिती संस्था असलेल्या युव्ही क्रिकेएशन्सने जाहीर केले.
'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील प्रसिद्ध कलाकारांनी ऍमी पुरस्कारांसाठी स्व सहभागाने स्वतःच्या नावाची नोंदणी केली असून त्यांना नॉमिनेशन देखील मिळाले आहे. एचबीओ ही गेम ऑफ थ्रोन्सची अधिकृत प्रसारण संस्था असून त्यांनी 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील कलाकाराचे नाव ऍमी पुरस्कारासाठी सुचवले नसल्याने स्वतः कलाकारांनी हा निर्णय घेतला.
‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारखी मालिका जगभर लोकप्रिय होते, ती तिच्या उच्च निर्मितीप्रक्रियेमुळे. नवमाध्यमांच्या आशयनिर्मितीच्या कामात भारत म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार आपल्याला कधीतरी गांभीर्याने करावाच लागेल.
अश्विन सर्वणन दिग्दर्शित 'गेम ओव्हर' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. 'गेम ओव्हर' हा चित्रपट एक रोमांचक कथा असून यामध्ये मनमर्जीया फेम तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहे.
शाहिद आफ्रिदीच्या आत्मचरित्राचे निमित्ताने पुन्हा एकदा आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
२१ तारखेला म्हणजेच येत्या रविवारी ९ वाजता हा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. गेम ऑफ थ्रोन्सचा हा शेवटचा सिझन असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या सीझन ८ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.