जुन्या ‘ज्युरासिक पार्क’ सिनेमात एक वाक्य होते, 'Life finds a way' निसर्ग सातत्याने उत्क्रांत होतो. आजचा कोणताही सजीव हा उद्या तसाच राहात नाही. वनस्पतीदेखील याच अवस्थेतून गेल्या आहेत. अशा या वनस्पतींच्या उत्क्रांतीचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
व्हिएतनाममध्ये रामकथेचा सांस्कृतिक प्रभाव अत्यंत खोल असून, तेथील समृद्ध परंपरेचा तो एक भाग आहे. प्राचीन ‘चम्पा’ राजवंशाने भारतीय संस्कृतीशी असलेली आपली नाळ अधिक दृढ केली आणि रामकथेचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला. ‘चाम’ व ‘खमेर’ समाजांनी आपल्या नृत्यनाट्य परंपरांमधून, रामायणाच्या कथा आणि पात्रांना सजीव ठेवले. ‘त्रुयेन कियू’ आणि ‘रोबन याक’ सारख्या लोककला प्रकारांमध्ये रामकथेतील मूल्ये, नीतिकथा आणि आदर्श यांचे प्रभावी दर्शन घडते. बौद्ध संस्कृतीत देखील रामकथेची छाया जाणवते, जिथे प्रभू राम आदर्श पुरुष व धर्मनिष्ठ
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि॥’ या तुकडोजी महाराजांच्या पंक्ती. पण, आजच्या स्त्रीने उद्योगजगतातही ठसा उमटविला आहे. याचा प्रत्यय नीती आयोगाच्या ‘फ्रॉम बॉरोअर्स टू बिल्डर्स : वूमन्स रोल इन इंडियाज् फायनान्शियल ग्रोथ स्टोरीज्’ अहवालातून समोर येतो. आगामी ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर या अहवालाचे आकलन...
मानवी भावभावनांचा, मैत्रीचा अर्थ सांगू पाहणार्या, एकाच वेळी प्रेम आणि कर्तव्य यांचा-त्यातील एकरूपता, रक्ताच्या नात्यापलीकडील मैत्रीचे अनुबंध जोडणारा ‘साकव’ या कथांमध्ये पाहताना वाचक म्हणून मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि त्यांची उत्तरे शोधताना आपण कथा पुढे वाचत जातो आणि त्या कथानकात आपोआप गुंतून जातो. कथासंग्रहातील कथांचे विषय जरी वेगळे असले तरी त्यांची विषय धाटणी, मांडणी, लेखनशैलीचा बाज लेखकास शेवटपर्यंत टिकवून धरण्यास यश आले आहे.
कथा, कादंबरी, नाटक, कविता तसेच लोकवाड्.मयातील गवळणी, भारुडे, लावणी, पोवाडे अशा वाड्.मयीन कलाप्रकाराच्या विविध अंगांनी मराठी वाड्.मय समृद्ध होत गेले. या वाड्.मय प्रकारांनी सर्वसामान्य माणसांचे मनोरंजन केले. त्यातील रसास्वादाचा आनंद रसिक घेत असतात.
‘पुरुष हृदय कठीण कठीण किती बाई,’ असं महिला म्हणतात. पण, ही बिनकठीण हृदयाच्या पुरुषांची गोष्ट आहे. त्यातला एक चाळिशीतला लंगडा चार्ली. एका वाद्यवृंदामध्ये व्हायोलिन वाजवायचा. न्यूयॉर्कमध्ये आल्यावर त्याला हेलन दिसली. त्याने वाद्यवृंद सोडला आणि इथेच बिंगडन स्क्वेअरमधील तिच्या घरात मुक्काम ठोकला. मग ते सारे घर आणि शेजार वेळीअवेळी वाजणार्या व्हायोलिनच्या करुण सुरांनी भरून जाऊ लागला.
स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते.
स्वरंग मराठीचा नवा उपक्रम "किस्से बहाद्दर"