महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरतीप्रक्रिया शासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात 'X'वर पोस्ट केली आहे. भरतीप्रक्रियेतील गैरप्रकार याबाबत पोलीस विभागाचा अहवाल पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.
Read More
गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने मूर्तीकारांची बैठक घेवून यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल.
महाराष्ट्र शासन अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील एकूण ६७० जागा रिक्त असून या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. यासंदर्भात सदर विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, शाडूच्या मातीची मूर्ती घ्यावी असे नागरिकांना आवाहान करीत आहे. गणेश विसजर्न स्थळावर दरवर्षीप्रमाणे यंदा ही कृत्रिम तलाव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पीओपीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी असे दोन तलाव असतील. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसजर्न झाल्यानंतर तलावात जमा झालेल्या शाडूची मातीचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. ही शाडूची माती कुंभारांना देण्यात येणार आहे. शाडूच्या मातीचा पुर्नवापर ही संकल्पना महापालिका प
नाशिक शहरात गेली दोन दशके गोदावरीला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी व्यापक जनचळवळ उभी राहिली आहे. विसर्जनाच्या दिवशी नदीमध्ये ‘पीओपी’ वा शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात नाही, तर मूर्ती संकलन केले जाते. महापालिका आणि शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थाकडून राबवल्या जाणारे मूर्ती संकलन कमालीचे यशस्वी होत आहे.
'माझी माती माझा देश' आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. यावरुनच उपमुख्यमंत्र्यांनी असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं, असं म्हणत टोला लगावला आहे.
नाशिक जिल्ह्याची ओळख राज्याची ‘कृषी राजधानी’ अशी केली जाते. मुंबई-पुण्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही नाशिकच्याच भाज्या, फळे आणि फुलांचा पुरवठा होतो. येथील अर्थव्यवस्था कांदा, द्राक्ष आणि एकूणच कृषी मालावर आधारित आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने नाशिकच्या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकणी अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे काही तालुक्यातील शेती वाहून गेली, तर बर्याच शेतांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचले.
पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत जाणारी माती आणि मातीचे होणारे द्रवीकरण कसे रोखता येईल, मातीच्या द्रवीकरणामुळे वृक्षलागवडीवर होणारे दुष्परिणाम, द्रवीकरण थांबवून मातीची होणारी हानी कशी थांबवता येईल इत्यादी संबंधी महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून त्याबाबतच्या संरक्षक उपाययोजना आपल्या प्रबंधामध्ये मांडत वृक्षसंवर्धनाकरिता मुंबईतील एक तरुण अभियंता विशाल कडणे गेली सात वर्षे सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारने पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचा उल्लेख केला.
आज आपण पाहतो की, बदलते हवामान व अनिश्चितेच्या काळात पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या हवामानासोबत मनुष्याने विकासाच्या नावाखाली उभारलेले पायाभूत सुविधांचे जाळे असो, ज्यामध्ये मोठमोठ्या इमारती, मेट्रो यांसारखे प्रकल्प असतील, त्यासाठी खूप मोठा निधी उभारला जातो.
“आन आणि मान ठाकूर यांचे स्मारक त्या दोन वीरांना वाहिलेली केवळ श्रद्धांजली नाही, तर हे शौर्यस्थळ येणार्या अनेक पिढ्यांना स्थानिक आगरी, कोळी बांधवांचे वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत काय योगदान आहे, हे दाखवून देणारे प्रतीक असेल. पुढच्या पिढीला या स्मृतिस्थळापासून प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांना नेपोलियन माहिती आहे, पण कान्होजी आंग्रे, आन ठाकूर किंवा मान ठाकूर हे आपल्या मातीतील वीर माहीत नसतात,” अशी खंत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केली.
भारतातील योग आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव हे भारत ते लंडन बाईक प्रवास करणार आहेत. महाशिवरात्री निमित्त त्यांच्या इशा योग्य केंद्रात झालेल्या महाशिवरात्री उत्सवात त्यांनी या बदलाची घोषणा केली
धारावीतील कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी तयार करण्याचे काम करतो. यामुळे त्याला भावही कमी मिळतो तसेच, इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमधून त्यांची सुटका होणार असून, त्यांना आधुनिक कलाकुसरीची जोड मिळणार आहे. यासाठी ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या कार्यकारी विश्वस्त दिव्या ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.
माती परीक्षण गरचेचे असून जास्त उत्पन्नाची हमी देणारे आहे जमिनीला कोणत्या खताची मात्रा किती द्यावी याची अचूक माहीती मिळते.
कुर्दांच्या या विजयामुळे जगाला कुर्द व पर्यायाने रोजावा क्रांतीची दखल घेणे भाग पडले. रोजावा क्रांतीमध्ये कुर्दांसोबत स्थानिक इतर वांशिक व धार्मिक लोकही सामील झाले होते. तसेच रोजावा बाहेरील काही योद्धे कुर्दांना साहाय्य देण्यासाठी या युद्धात सामील झाले होते. अशाच काही हुतात्म्यांची माहिती आपण जाणून घेऊया.
उन्हाळा सुरु झाला असून वाढते उष्णतामान आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे भूजल आणि जलाशयाची पातळी कमी होते, साहजिकच नदी, तलाव, विहीर यांचे पाणी कमी होते.