नवी दिल्ली: भारतातील योग आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव हे भारत ते लंडन बाईक प्रवास करणार आहेत. महाशिवरात्री निमित्त त्यांच्या इशा योग्य केंद्रात झालेल्या महाशिवरात्री उत्सवात त्यांनी या बदलाची घोषणा केली. १०० दिवस, २७ देश आणि ३० हजार किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. सेव्ह सॉईल मोहिमेसाठी ते हा प्रवास करणार आहेत. या १०० दिवसांत रोज किमान ५ मिनिटेतरी माती बद्दल बोला असे साधुगुरु यांनी आवाहन केले आहे.
"जगातील 'भूमी' हे ते एकमेव आश्चर्य आहे की जिथे मृत व्यक्तीला पुरले तरी त्यातून झाडच उगवते. आपण मातीतूनच जन्म घेतो मातीतूनच उगवलेले अन्न खातो आणि शेवटी मातीतच विलीन होतो" असे साधुगुरु म्हणाले. जगातील शास्त्रद्यांनी फक्त पुढची ५५ वर्षेच आपल्याकडे शेतीयोग्य जमीन असेल त्यामुळे जमिनीचे संवर्धन ही काळाची गरज आहे यासाठीच साधुगुरु यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.