मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ८ एप्रिलपासून मुंबई मेट्रो२बच्या 'मंडाळे ते डायमंड गार्डन' दरम्यानच्या ५.६ किमी लांबीच्या ओव्हरहेड इक्विपमेंट(ओएचई)चा विद्युतप्रवाह सुरू करणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
Read More
वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन-२बी व्हायाडक्टच्या ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड ब्रिजचे बांधकाम सुरु आहे
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेट्रो २अ ( दहिसर – डी. एन. नगर ) आणि मेट्रो ७( दहिसर – अंधेरी ) मार्गिकेवर अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. पावसाळ्यात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता दिवसाला ७ मिनिटांच्या वारंवारतेसह या मार्गिकांवर २४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली आहे.
मुंबईतील मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वर एकाच दिवसात २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत एका दिवसांतील प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला आहे. हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो २ अ वरील मालाड पश्चिम स्थानकाचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मालाड मेट्रो स्थानक, असे करण्यात आले आहे. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून स्थानकाला हे नाव देण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना सोमवार, दि. २० मे, रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाने घेतला होता. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ तब्बल ७६,५९६ प्रवाशांनी घेतल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली.
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून, शून्य विलंब हे मेट्रो सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमी संस्था, बॉलीवूड सेलिब्रिटी ठाकरे सरकारच्या काळात मात्र, चिडीचूप आहेत.
आरेमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान करण्यात आलेल्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आलेल्या एकूण २९ आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर बोरीवली सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. ताब्यात घेतलेल्या ३८ जणांपैकी २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. यावेळी सर्व २९ जणांना जामिन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या मेट्रोचा पहिला चाचणी डबा सोमवारी मुुंबईत दाखल झाला.