यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो दि. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, मंगळवार, दि. 27 मे रोजीपासून मान्सूनच्या प्रवासाची वेग कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Read More
हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.
अभिनेता शाहरुख खान याने नुकतेच २० मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान कुटुंबासह केले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे आयपीएलच्या मॅचसाठी गेला असता उष्माघातामुळे एकाएकी तब्येत बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात काल दिनांक २२ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे त्याची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला हिने सांगितले आहे.
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.
जागतिक पर्यावरण व्यवस्थेत महासागरांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. जलचक्राचे होणारे व्यवस्थापन हे केवळ अन् केवळ महासागरांवर अवलंबून आहे. विविध उद्योग, दळणवळण, पर्यटन यात सागर व सागर किनारे यांचे महत्त्व वेगळे विशद करण्याची नक्कीच आवश्यकता नाही.
आपले शरीर हे जगातील सर्वात सुंदर, बरेचसे किचकट आणि छान अचूकता असलेले यंत्र आहे. शरीरातील असंख्य पेशी आपले कार्य पार पाडत असतात.
येत्या 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
३० जून पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश