बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या (युएपीए/ UAPA) तरतुदींना आव्हान देणारी याचिका गुरुवार दि.१७ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत, या कायद्याला घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवले. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “सध्याच्या स्वरूपात युएपीए हा कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली आव्हान याचिका ही आधारहीन आहे.”
Read More
संसदेत घुसखोरी करणाऱ्या सर्व आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी पोलिसांना दिली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस संसदेवरील हल्ल्यातील सर्व आरोपींवर युएपीए कलम लावणार आहेत.
बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) अटकेत असलेला न्यूजक्लीकचा संपादक प्रबीर पुरकायस्थ यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजुर केला आहे.युएपीए अंतर्गत एका प्रकरणात ऑनलाइन न्यूज पोर्टल न्यूजक्लिकचा मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ याची अटक आणि कोठडी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने जामीन बाँड भरण्याच्या अटीवर पुरकायस्थला सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने दहशतवादाशी निगडीत UAPA प्रकरणास सोमवार, दि. ६ मे रोजी सुनावणी केली. यात अम्मार अब्दुल रहमानला जामीन मिळाला आहे. हा तरुण इसिसशी निगडीत असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने म्हटले की, "ओसामा बीन लादेनचा फोटो, जिहाद प्रचार आणि इसिसचा झेंडा ठेवला म्हणून कुणी दहशतवादी होत नाही."
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे सदस्य मोहम्मद कासिम गुजरला दहशतवादी घोषित केले आहे. कासिम सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत आहे. गृह मंत्रालयाने गुरुवारी त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले.
हरियाणा पोलिसांनी जुलै २०२३ च्या नूह दंगलीशी संबंधित चार प्रकरणांमध्ये काँग्रेस नेते आणि आमदार मम्मन खान यांच्यासह ६३ लोकांविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) लागू केला आहे. जानेवारी २०२४ मध्ये यूएपीए अंतर्गत नवीन कलम जोडण्यात आले. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या स्थिती अहवालानुसार, दि. ८ जानेवारी रोजी तीन एफआयआरमध्ये (क्रमांक २५३, २५७ आणि ४०१) यूएपीए च्या तरतुदींचा समावेश करण्यात आला होता.
कॅनडातील आणखी एका खलिस्तानीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) सदस्य लखबीर सिंग लांडा याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. लांडावर भारतात खून आणि खुनाचा प्रयत्न असे डझनभर गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भीमा कोरेगाव दंगल आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील संबंधित भूमिकांसाठी अटक करण्यात आलेल्या शोमा सेन आणि उमर खालिद यांचे समर्थन करणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या 'एक्स' अकाउंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे.
लोकसभेमध्ये घुसून सुरक्षेव्यवस्थेचा भंग करणाऱ्या हल्लेखोरांविरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना गुरूवारी पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले.
केरळमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटातील आरोपी डॉमिनिक मार्टीनवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि स्फोटक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
पत्रकार राणा अय्युब यांचा हिंदूंविरोधी अपप्रचार करण्याचा आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पत्रकारांचा’ बचाव करण्याचा इतिहास आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि दिल्ली पोलिसांनी चीन-अनुदानित न्यूजक्लिकच्या विरोधात नुकत्याच केलेल्या कारवाईवर टीका करताना राणा अय्युब यांनी जाणूनबुजून खोटी माहिती शेयर केली.
चिनकडून वित्तपुरवठा होत असल्याचे आरोप असलेल्या न्यूजक्लीक या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. यावेळी सायंकाळी न्यूजक्लीकचे कार्यालयदेखील सील करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर चीनी अजेंडा चालविण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (युएपीए) न्यायाधिकरणाने मंगळवारी कट्टरपंथी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियास (पीएफआय) बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याचा आणि त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.
“पंजाब पॉलिटिक्स टीव्ही” चे अॅप्स, संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खाती प्रतिबंधित (ब्लॉक) करण्याचे आदेश दिले आहेत.
शरजील इमाम याच्यावरदेशद्रोहाचा आरोप निश्चित
कट्टरतावादी इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ला (आआरएफ) बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) बेकायदेशीर संघटना केंद्र सरकारतर्फे घोषित करण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी. एन. पटेल यांच्या एकसदस्यीय न्यायाधिकरणाने केंद्र सरकारच्या त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सोमवार, दि. २० डिसेंबर रोजी ‘आयआरएफ’ला नोटीस जारी केली आहे.
बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअन्वये (यूएपीए) हुर्रियत कॉन्फरन्सच्या सर्व संघटनांवर कारवाईचे संकेत
संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ केलेल्या सचिन वाझे प्रकरणी आता आणखी माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने आता सचिन वाझेंची १५ दिवसांची कोठडी मागितली आहे.
पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने केली कारवाई
नक्षलवादी कारवायात सहभागी वकिलाचा जामीन फेटाळला
एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचे अधिकार देणार्या बेकायदा कारवाया प्रतिबंध अर्थात ’यूएपीए’ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. हे विधेयक असंवैधानिक असल्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत केली गेली आहे.
राज्यसभेत युएपीए (बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार
मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जी काही पावले उचलत आहेत, त्यामागे मोठ्या लढाईची तयारी चालू असल्याचे नक्कीच जाणवते. जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत झालेली घट, नुकतेच शक्तीशाली केलेली 'एनआयए' ही तपास यंत्रणा, तर 'युएपीए' कायद्यातील व्यक्तीलाही दहशतवादी ठरवण्याची दुरुस्ती या सगळ्याच घडामोडींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दिन व अन्य सहा जणांच्या संपत्तीवर टाच आणल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. काश्मिरी खोऱ्यात एकूण १३ ठिकाणी छापे टाकून १.२२ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.