नवी दिल्ली : लोकसभेमध्ये घुसून सुरक्षेव्यवस्थेचा भंग करणाऱ्या हल्लेखोरांविरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना गुरूवारी पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने लोकसभेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारही आरोपींना बुधवारी अटक केली होती. त्यानंतर पाचव्या संशयित आरोपीसदेखील गुरूग्राममधून अटक करण्यात आली आहे. या पाच जणांविरोधात युएपीएअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणातील सहावा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
तपासात असे दिसून आले की सहा आरोपींपैकी एक असलेल्या 35 वर्षीय मनोरंजन डी हा जुन्या संसद जुन्या संसद भवनात आयोजित अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित होता. यावेळी त्यांने सुरक्षा यंत्रणेची बारकाईन पाहणी केली होती. त्यामध्ये बुट तपासले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर बुधवारी तो सागर शर्मा सोबत चपलामध्ये धुराचे डबे लपवून संसद भवनात दाखल झाला, असे तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.