( Nitesh Rane on Temporary boat facility at Jetty No 5 of Gateway of India ) गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात 49 बोटींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मार्गाचा वापर करणार्या बोटींमधून वाहतूक करणार्या प्रत्येक प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्र
Read More
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.
५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
जेएनपीए ते मुंबई दरम्यान सागरी मार्गाने प्रवास कार्यासाठी इलेक्ट्रिकल फेरी बोट चालविण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने घेतला आहे. ही फेरीसेवा जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती जेएनपीएने दिली आहे. या इलेक्ट्रिकल फेरी बोटमुळे मुंबई ते जवाहरलाल नेहरू पोर्ट प्रवास २० मिनिटांनी कमी होईल. म्हणजे मुंबई ते जेएनपीए हा प्रवास अवघ्या ३० ते ४०मिनिटांवर येणार आहे.
(Neelkamal Boat Accident) मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी फेरीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार टक्कर दिल्याने उरण, कारंजा परिसरात बोट उलटली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. दुर्घटनेपासून बेपत्ता असलेल्या एका लहान मुलाचा मृतदेह शनिवारी शोधमोहिमेत सापडला आहे.
Manda Mhatre फेरीवाले आणि नौदल समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी बोटी चालवतात. त्यामुळे त्यांना मार्ग ठरवून द्यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला.
बोटीत ३० हून अधिक प्रवासी; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
नीलकमल बोट दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय नौदल, कोस्टगार्ड आणि मुंबई पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेची राज्य सरकार आणि भारतीय नौदलाकडून सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, प्रवासी क्षमतेहून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
अलिबाग व एलिफंटा जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवी जेट्टी
वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला उत्तम प्रतिसाद आहे. मात्र पावसाळा सुरु होणार असल्याने या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस सेंटर तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारू, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच; पण संपूर्ण देशाची आर्थिक राजधानीसुद्धा. मुंबई म्हणजे बेटांचा समूह आणि पोर्तुगीजांकडून आंदणात मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी ही मुंबानगरी वसवली. पण, या मुंबईत अगदी हाकेच्या अंतरावर अशा अनेक वास्तू आधुनिक इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. ‘भारतीय इतिहास संकलन समिती’ मुंबईचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा वारसा अभ्याससहलींचे आयोजन करत असते. ‘इतिहास संकलन समिती’चे सदस्य, अभ्यासक आणि लेखक मल्हार कृष्ण गोखले या वारसा सहलींमध्ये जुन्या-नव्या संदर्भांसह रंजक पद्धतीने मार
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आता दर शनिवारी आणि रविवारी मल्टिमीडिया अॅण्ड साऊंड शोचा नुकताच शुभारंभ झाला आहे. तसेच मुंबईतही ठिकठिकाणी सुशोभीकरण प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. तेव्हा, या सुशोभीकरण प्रकल्पाचे एकंदर स्वरुप जाणून घेण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच...
दरवर्षी कोकण किनारपट्टीवर भरकटलेली जहाजे येऊ लागली आहेत. हा सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. कारण, या जहाजांमध्ये धोकादायक साहित्य असू शकते. काही दहशतवादी संघटना, तस्कर, त्याचा वापर तस्करीसाठी, देशविघातक कारवायांसाठी करू शकतात. जहाज मुद्दाम भरकटवून किनार्यापाशी आणून काही धोकादायक साहित्य किनार्यावर आणले जाऊ शकते. तसेच या जहाजांमध्ये जे इंधन असते, ते जर समुद्रात पसरले, तर पर्यावरणाला धोकादायक ठरू शकते.
आपल्या मुंबईत एक प्रसिद्ध स्मारक आहे, ‘गेटवे ऑफ इंडिया.’ ब्रिटिश सरकारची व्यावसायिक, म्हणजेच व्यापारिक पद्धतीने भारतात, मुंबईतून सुरुवात झाली आणि त्यांची प्रातिनिधिक शेवटची तुकडीदेखील 1947 साली या ‘दरवाजा’तूनच आपल्या मायदेशी परत गेली, असे समजले जाते. त्यामुळे या स्मारकाचे आपल्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. असेच एक आधुनिक इतिहासात महत्त्वाचे स्थळ आपल्या पश्चिमेकडील इराण या देशात आहे. त्याचे नाव चाबहार! याला कित्येक ठिकाणी ‘चाह बहार’ असे देखील म्हणतात. हे काय प्रकरण आहे, त्याचे आधुनिक इतिहासात भारतासाठी
लिबागमधील मांडवा जेट्टीपासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली असून या बोटीतील सर्व प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याने एक मोठी घटना टाळली.
सकाळी मांडवा जेट्टीजवळ अलिबागला जाणारी प्रवासी बोट उलटली परंतु पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ८८ जणांचे वाचवले प्राण
'फ्री काश्मीर' पोस्टरवरून शिवसेनेवर संबित पात्रांचं टीकास्त्र
चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती