गेटवे ऑफ इंडियाच्या पाच नंबर जेट्टीवर तात्पुरती बोट सुविधा - नितेश राणे

    21-Mar-2025
Total Views | 13

Nitesh Rane on Temporary boat facility at Jetty No 5 of Gateway of India
 
मुंबई:  ( Nitesh Rane on Temporary boat facility at Jetty No 5 of Gateway of India ) गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मार्गाचा वापर करणार्‍या बोटींमधून वाहतूक करणार्‍या प्रत्येक प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.
 
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडियादरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे प्रस्ताव दिले. या ४९ प्रस्तावांना मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर आणि एलिफंटा या जलमार्गासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर दि.
 
२५ मे रोजीपर्यंत प्रतिमहिना प्रति स्पीडबोटीसाठी 4 हजार, 999 रुपये (जीएसटीसहित) किंवा डिसेंबर, २०२४ ते मे, २०२५ या कालावधीकरिता रक्कम ३० हजार रुपये (जीएसटीसहित) इतके परवानगीकरिता प्रवासी शुल्क ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’मार्फत निश्चित करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121