रिलायन्स डिजिटलने अजेय ऑफर्ससह डिजिटल इंडिया सेल सुरू केला आहे. या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्री सेलद्वारे ग्राहक सर्व रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्सवर आश्चर्यकारक ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
Read More
‘एआय’सारखे नुकतेच आलेले तंत्रज्ञान असो वा कॅशलेस इकोनॉमी, अमेरिकेसारख्या महासत्तेला जे साध्य करता आले नाही, ते भारताने ‘युपीआय’च्या माध्यमातून करून दाखवले. ‘युपीआय’च्या व्यवहारांची संख्या आणि त्याची रुपयांतील उलाढाल ही स्वतःचेच विक्रम मोडत असून, नवनवे विक्रमही प्रस्थापित करत आहे. भारतीय शेअर बाजाराची कामगिरीही अलीकडे ऐतिहासिक ठरली. अशी ही नव्या भारताच्या विकासाची पदचिन्हे सर्वस्वी कौतुकास्पद अशीच...
या दशकाच्या अखेरीस म्हणजेच २०३० सालापर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर इतकी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिका, चीन यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांना मागे टाकत, भारत अशी कामगिरी करणार आहे, हे विशेष. या पार्श्वभूमीवर इंटरनेट अर्थव्यवस्थेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावे.
सध्याचे व्यवसाय विश्व पुरतेपणी संगणकीय म्हणजेच ‘डिजिटल’ झाले आहे. माहिती म्हणजेच डाटा, ‘कृत्रिम बुद्धिमता’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ आणि संपर्क म्हणजेच ‘कनेक्टव्हिटी’ या तीन मूलभूत घटकांवर आधारित ‘चॅट जीपीटी’ या नव्या क्रांतिकारी संवाद शैलीने उद्योग-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे बदल व त्यांचा व्यावसायिक क्षेत्रावर होणारे परिणाम या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या ठरल्या आहेत. आता ही बाब तर सर्वमान्य ठरली आहे की, सध्या व्यावसायिक सं
'युद्धस्य कथा रम्या’ अशी एक म्हण आहे. परंतु, आता बदलत्या ‘स्मार्ट’ युगात युद्धस्य कथा या डिजिटल स्वरुपात म्हणजेच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढल्या जातील. युद्ध कथा वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीच चांगल्या वाटतात. मात्र, त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो, त्यांच्यावर त्याचे नक्कीच दूरगामी परिणाम दिसून येतात. तरीही जग हे नेहमीच युद्धाच्या तयारीत असते. हे युद्ध कधीकाळी जमिनीवर लढले जायचे, त्यात कालपरत्वे बदल होत जाऊन ते पाण्यात आणि आकाशातही लढले जाऊ लागले.
आतापर्यंत सोन्यातील गुंतवणूक आणि गोल्ड ईटीएफ’ याविषयी आपण विविध लेखांतून माहिती करुन घेतली आहेच. आजच्या या लेखातून गुंतवणूक फोर्टफोलिओसाठी योग्य ‘गोल्ड ईटीएफ’ची निवड कशी करायची, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची दिवसेंदिवस प्रगती होत असून भारतीय नागरिक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैश्यांचा भरणा करीत असल्याची माहिती सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अर्थांत एसटीपीआयने आज एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.