'रिलायन्स डिजिटल'ची अनोखी ऑफर; 'डिजिटल इंडिया सेल'मध्ये मिळवा भरघोस सूट
14-Aug-2024
Total Views |
मुंबई : रिलायन्स डिजिटलने अजेय ऑफर्ससह डिजिटल इंडिया सेल सुरू केला आहे. या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्री सेलद्वारे ग्राहक सर्व रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्सवर आश्चर्यकारक ऑफरचा लाभ घेता येणार आहे. दि. १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत विक्री सेल ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. खरेदीदार सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर २५ टक्क्यांपर्यंत सवलतीसह ईएमआय पर्यायांसह वस्तू उपलब्ध असतील.
या सेलमध्ये ग्राहकांना सर्व रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्सवर आकर्षक ऑफर्सचा आनंद घेता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून किचन इक्विपमेंट्सपर्यंतच्या वस्तू सवलतीच्या स्वरुपात उपलब्ध असणार आहेत.
उत्तम डील्स पुढीलप्रमाणे :-
५५ इंच यूएचडी टीव्ही फक्त ₹29,990 पासून
आयफोन 13 फक्त ₹47,600 आणि लेटेस्ट आयफोन 15 फक्त ₹63,600 मध्ये
तसेच, इंटेल कोर i5 लॅपटॉप्सची सुरुवात फक्त ₹39,999 पासून
तुमच्या किचनचं सौंदर्य वाढवण्यासाठी आहे प्रशस्त साइड बाय साइड रेफ्रिजरेटर फक्त ₹48,990 मध्ये
तुम्ही लाँड्रीचा निराळा अनुभव घेऊ शकता फक्त ₹19,990 च्या टॉप लोड वॉशिंग मशीन सोबत
एनर्जी- एफिशिअंट एअर कंडिशनर्सने मात करू शकता आणि ₹6,000 पर्यंत सूट मिळवू शकता