(Russian Plane Crash) चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील भागात ५० जणांना घेऊन जाणारे अँटोनोव्ह An-24 हे प्रवासी विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे. हे विमान सोव्हिएत काळातील होते आणि जवळजवळ ५० वर्षे जुने होते. त्याच्या टेल क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले होते असे दिसून येत आहे.
Read More
बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या विमान अपघातादरम्यान मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी फेसबुकवर पोस्ट करून देशवासीयांना मदतनिधी देण्याचे आवाहन केल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बरीच टीका झाली. नेटकऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. हे प्रकरण इतके वाढले की शेवटी मोहम्मद युनूस यांना त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करावी लागली. विमान अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकार असमर्थ असल्याचे बोलले जात आहे
(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क
(AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपू
विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.
(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर
(IAF Jaguar Fighter Jet Crashes)भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान बुधवारी ९ जुलैला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत एअर इंडियाने संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीला (पीएसी) आपले उत्तर सादर केले आहे. कंपनीने बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरचा बचाव केला आणि म्हटले की ते सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे.
अहमदाबादच्या भीषण विमान अपघातानंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुनश्च ऐरणीवर आला. या अपघाताची रीतसर चौकशी सुरु असून, त्यामागील कारणेही लवकरच स्पष्ट होतील. पण, या दुर्घटनेनंतर विमानतळ अधिकारी व विमान वाहतूक कंपन्यांच्या व्यवस्थापनांनाही आपल्या कार्यशैलीमध्ये सुरक्षा तसेच अन्य ग्राहकसेवांच्या अनुषंगाने आमूलाग्र बदलाची प्रक्रिया आरंभलेली दिसते.
(Ohio Plane Crash) अमेरिकेतील ओहायो येथील यंग्सटाऊन-वॉरन विमानतळावर झालेल्या खासगी विमान अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळले आणि भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीसह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मॉन्टाना येथील बोजमन येथे सुट्टीसाठी निघाले होते. याशिवाय विमानाचे दोन्ही वैमानिक या भीषण अपघातात मृत पावले आहेत.
(Ahmedabad Air India Plane Crash) दोन आठवड्यांपूर्वी एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून दुसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला होता. भीषण स्फोटामुळे या ब्लॅक बॉक्सचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यातील माहिती मिळवणे आव्हानात्मक होते. मात्र, आता त्यातील माहिती यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या सर्व बोईंग विमानांचे संपूर्ण सूरक्षा ऑडिट होईपर्यंत सर्व विमानांची विमानसेवा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील अजय बन्सल यांनी दाखल केली आहे. देशातील विमान सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ही याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
(Air India Plane Crash) एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला निघालेल्या AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या मिनिटांतच ते विमानतळाजवळील नागरी परिसरात कोसळले. या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचा उलगडा होणे गरजेचे आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाल्यामुळे भारतात त्याच्यातील माहिती मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स विश्लेषणाकरिता अमेरिकेत पाठविला जाणार आहे.
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?
अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा दि. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. यात २७४ नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच, टाटा ग्रुपने एक्स या समाजमाध्यमावर अधिकृत घोषणा करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमी झालेल्यांसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाईल, असे जाहीर केले होते.
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या
एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज, १७ जून रोजी नागरी विमान वाहतूक सुरक्षेबाबत एक उच्चस्तरीय बैठक होणे अपेक्षित आहे.
हमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI 171 च्या भीषण अपघातात गुरुवार, दि.१२ जून रोजी,२६५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. जखमींचा आकडाही जास्त आहे. या अपघातावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करावी, अशी मागणी दोन डॉक्टरांनी भारताचे सरन्यायाधीश यांना लिहिलेल्या एका पत्रात केली आहे.या पत्रात त्यांनी पीडितांच्या कुटुंबांना त्वरित आणि सन्मानजनक भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली आहे.
उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात केदारनाथहून फाटाकडे परत येणारे खासगी हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ यात्रेकरू आणि १ पायलट यांचा समावेश आहे.
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता २७४ वर पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच विमानाच्या मागच्या भागात आणखी एक मृतदेह आढळला असून विमानाचा ढिगारा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी देऊ,
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे म
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने आपला जीव गमावला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती.
अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असताना लवकरच हा अपघात नेमका कसा झाला या प्रश्नाचे गूढ उलगडणार आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती समोर आली असून यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा आवडता क्रमांक ‘१२०६’ हा पुन्हा चर्चेत आला आहे. दि. १२ जून (12/06) रोजी एअर इंडियाच्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. विजय रुपाणी यांनी १२०६ हा क्रमांक ते लकी मानत. त्यांच्या पहिल्या स्कूटरपासून ते सर्व मोटार गाड्यांपर्यंत त्यांनी १२०६ हा नंबर कायम ठेवला. तो त्यांचा भाग्यांक होता. परंतु आयुष्याच्या अखेरीस हाच क्रमांक चर्चेचा विषय ठरला.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळखही पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता मृत व्यक्तींच्या डीएनए चाचण्या करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनमध्ये राहणाऱ्या भूमी चौहान यादेखील या विमानातून प्रवास करणार होत्या. मात्र, विमानतळावर पोहोचण्यास १० मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच
अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट १७१ चा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि काही प्रवासी गंभीर जखमी झाले. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा १२ जून २०२५ रोजी अपघात झाला. या भीषण अपघातात अनेकांचे प्राण गेले. त्यातील एक कुटुंब चर्चेत आहे – राजस्थानमधील डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांच्या तिन्ही मुलांचा. डॉ. हेमंत राजपुरोहित हे लंडनमध्ये वैद्यकीय सेवेत होते. त्यांच्या पत्नी डॉ. खुशबू राजपुरोहित या भारतात होत्या. विमानात चढण्यापूर्वी त्यांनी एक गोड सेल्फी घेतला होता. सगळे हसत होते. तीच त्यांची शेवटची आठवण ठरली.
(Bhagavad Gita at Ahmedabad Plane Crash Site) गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात एकूण २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि वसतीगृहातील २४ जणांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाश्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. विमान पूर्णतः उद्धवस्त झाले. घटनास्थळी विमानाचे जळालेले अवशेष आणि लोकांचे मृतदेह विखुरलेले होते.
(Bhumi Chauhan) गुजरातमधील भरूचमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातून सुदैवाने वाचली आहे. कारण भूमीला विमानतळावर पोहोचण्यास दहा मिनिटे उशिर झाला होता. त्यामुळे भूमीची फ्लाईट मिस झाली अन् सुदैवाने तिचा जीव वाचला. भूमीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ती अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने प्रवास करणार होती. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ती सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दहा मिनिटे उशिरा पोहोचली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विमानतळावर तिला एन्ट्री न
अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १३ जून रोजी घटनास्थळी जात पाहणी केली. दरम्यान, या अपघातात मृत्यूमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे.
(Air India Plane crashes in Ahemdabad) अहमदाबाद विमानतळाजवळ एक मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानामध्ये १३३ प्रवासी असल्याची माहिती आहे.
(Ahmedabad Plane Crash) गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी आणि २ वैमानिकांसह एकूण १२ कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना घडली असून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेदेखील या विमानातून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह तातडीने गुजरातकडे रवाना झाले आहेत.
(Ahmedabad Plane Crash Updates) गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विमानातील प्रवाश्यांविषयी एअर इंडियाने माहिती दिली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या प्रवासी विमान अपघाताच्या घटनेनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, हे विमान अहमदाबादमधील एका वसतीगृहावर कोसळले असून यात वसतीगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे दु:खद निधन झाले आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून मोठा अपघात घडला असून विजय रुपाणी हेसुद्धा या विमानातून प्रवास करत होते.
अहमदाबाद विमान अपघातानंतर नवी दिल्ली येथे नागरी उड्डाण मंत्रालयाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली असून ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
अहमदाबादमध्ये गुरुवार, १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यानिमित्ताने १९ ऑक्टोबर १९८८ मध्ये अहमदाबादमध्येच झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल.
(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
Kazakhstan plane crash कझाकिस्तानातील अकातू विमानतळानजीक एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकूण १०० प्रवासी आणि इतर ५ क्रू मेंबर हे विमानातून प्रवास करत होते. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी या दुर्घटनेची माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी घडली आहे. त्यापैकी एकूण १० प्रवासी वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Plane crash उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका विमानाचा हवेतच पेट घेतल्याने अपघात (Plane crash) झाल्यीच दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी घडली आहे. विमान अपघात होऊन ते विमान शेतात कोसळ्याची घटना आहे. अपघातावेळी विमानातील पायलट आणि अन्य एका व्यक्तीने उडी मारून आपला जीव वाचवला आहे. विमान जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला. हा अपघात आग्रा येथील कागरौल भागातील सोंगा गावानजीक एका मोकळ्या शेतात हा अपघात झाला आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे बुधवार, दि. २४ जुलै २०२४ एक मोठा विमान अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण भरताना कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
रशियाच्या मॅास्को येथे एक सुखोई सुपरजेट- १०० प्रवासी विमान कोसळले आहे. त्यात तिघाचा मृत्यु झाला . शुक्रवारी रशियन प्रवाशी विमान प्रवाशांशिवाय उड्डान करत असताना क्रॅश झाले. तर हे सुखोई सुपरजेट १०० हे विमान मॅास्को प्रदेशात कोसळले. या विमानात प्रवासादरम्यान एकही प्रवासी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुरुस्तीनंतर हे विमान मॅास्कोच्या वनुकोव्हे या विमानतळावर जात होते. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली आणि विमानाचे दोन तुकडे झाले.