बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम मधील सदस्य आणि वनमजूर यांच्यावर शुक्रवार दि. ११ जुलै रोजी मगरीने हल्ला केला (crocodile attack). मगर बचावासाठी गेलेल्या राज भोईर यांच्यावर हा हल्ला झाला (crocodile attack). राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीममधील सदस्य जखमी होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना असल्याने सदस्यांचा जोखीम विमा आणि जोखीम भत्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे (crocodile attack). तसेच यानिमित्ताने बचाव पथकात काम करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा देखील निश्चित करणे आवश्यक आहे. (crocodile
Read More
"माणसाच्या मूळ भावनांपासूनच, त्याची कला बहरते, त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ती मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही " असे प्रतिपादन सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी केले. शुक्रवार संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पुलं कट्ट्यावर ते बोलत होते. यावेळी निवेदिका उत्तरा मोने, व दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी अच्युत पालव यांची मुलाखत घेतली.
मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन शुक्रवार दि. ११ जुलै रोजी आठ परदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आली (exotic wildlife seized). बॅंकाॅकमधून आलेल्या या वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशात पाठवण्यात आले आहे (exotic wildlife seized). गेल्या महिन्याभरात मुंबई विमानतळावरुन पकडलेले हे परदेशी वन्यजीव तस्करीचे हे सातवे प्रकरण असून यामाध्यमातून ३७२ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले आहे. (exotic wildlife seized)
‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी आपले अवघे आयुष्य शोषित, वंचित समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. आज, शनिवार, दि. 12 जुलै रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रभुणे काकांच्या समग्र कार्याचा परिचय करून देण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘समाजऋषी गिरीश प्रभुणे’ हा विशेषांक प्रसिद्ध करीत आहोत. अर्थात, गिरीश प्रभुणे यांच्या विचारकार्याचा इत्थंभूत तपशील एका विशेषांकात मांडणे अशक्यच. त्यामुळे या विशेषांकात प्रभुणे काकांचे विचारकार्य, रा. स्व. संघ समर्पित जीवन आणि त्यांच्या विचारांमुळे शून्यातून घडलेल्य
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पाकोळी कुळातील हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेत आढळतो. (Brown-backed Needletail)
भटके-विमुक्त समाजासाठी नि:स्पृहपणे कार्य करणार्या ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांचा संघर्षमय जीवनप्रवास अनेकांंना ठावूक आहेच. मात्र, भटके-विमुक्त समाजाचा ज्ञानसंपन्न वारसा, आज या समाजात घडून आलेले परिवर्तन आणि एकूणच या समाजासोबत काम करतानाची अनुभवांची शिदोरी, याविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी समाजऋषी गिरीश प्रभुणे यांच्याशी साधलेला हा संवाद...
भटके-विमुक्त आणि अशाच प्रकाराच्या सर्वच शोषित-वंचित समाजबांधवांचे ‘काका’ म्हणून परिचित असलेले प्रभुणे काका म्हणजे ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे. यमगरवाडी, अनसरवाडा, गुरुकुलम् अशा अनेक समाजहिताच्या प्रकल्पांना भेट दिल्यावर काकांचे कष्ट आणि समाज तपश्चर्या जाणवते. त्यांच्या प्रयत्नांनी उभे राहिलेले सर्व समाजप्रकल्प म्हणजे एक अध्याय, एक अथांग प्रेरणाच! या समाजप्रकल्पांचा आणि समाजघटकांचा मागोवा घेताना ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे नावाच्या माणसाचे माणूसपण समजत जाते. त्या माणूसपणाच्या समाज जाणिवेचा मागोवा घेणारा हा लेख.
जनसुरक्षा विधेयकावर आक्षेप घेण्यापूर्वी किमान महाविकास आघाडीच्या नेत्यांशी तरी चर्चा करायची, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना केला आहे. त्यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे-राऊतांवर निशाणा साधला.
काही माणसे आपल्याला सर्वांर्थाने कळली, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात मात्र आपण केवळ आपल्या बुद्धी व आकलनाच्या आधारे ती व्यक्ती कळली, असा दावा करत राहतो. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे काकांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. गिरीश काका म्हटले की भटक्या-विमुक्त समाजातील त्यांचे काम डोळ्यांसमोर उभे राहते. असाहाय्य, अकिंचन, अशिक्षित समाजाला मुख्य धारेशी जोडण्यासाठी गिरीश काकांनी काम केले. प्रचलित सामाजिक चळवळी व संस्था-संघटनांचा इतिहास पाहता, हे काम गिरीश काकांनी का केले? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, स्वतः गिरीश काक
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील अनेक पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली, पण सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भूमिका म्हणजे जेठालाल गडा. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज तिचं नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर फक्त दिलीप जोशीच येतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे अभिनंदन केले आहे.
समाजयोद्धा गिरीश प्रभुणे यांच्या कार्याला समर्पित या विशेषांकात, त्यांच्या छत्रछायेत घडलेल्या आणि आज समाजात मानाने उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनकथा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसमोर यानिमित्ताने सादर करीत आहेत. पारधी, आदिवासी आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, संस्कार, स्वाभिमान आणि माणूसपण देत गिरीश प्रभुणे यांनी हजारो कुटुंबांचे आयुष्य उजळवले. केवळ शिक्षकच नव्हे, तर एक पालक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून त्यांनी समाजपरिवर्तनाची व्यापक चळवळ उभी केली. तेव्हा गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक बां
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्याचा मृत्यू झाला (cheetah died in kuno).
सुशील शिंदे यांच्या जीवनात एक काळ असा होता, जेव्हा शिक्षण, सुरक्षितता आणि भविष्याची दिशा या सगळ्या गोष्टी अंधारात हरवलेल्या होत्या. त्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात मिळाला, तो ‘गुरुकुलम्’ या संस्थेचा आणि गिरीश प्रभुणे काकांचा! प्रभुणे काकांनी उभा केलेला ‘गुरुकुलम्’ प्रकल्प केवळ एक शाळा नाही, तर माणुसकीचं घर, संस्कारांची शाळा आणि आत्मविश्वास देणारं स्थान आहे. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजातील आणि पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ही चळवळ उभी केली.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आई- बाबा नाहीत, कुणीही नाही... ही सल एखाद्या लहान लेकराच्या डोळ्यात दिसली, तर काळीज हादरतं. अशीच एक गोष्ट आहे रेखा, शितल, अर्जुन आणि रामकृष्ण या चार भावंडांची. वडील गेल्यानंतर एका क्षणात त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं. घर नाही, आधार नाही, नातेवाईकांनीही साथ सोडली. लहान वयातच त्यांच्या डोळ्यात अनाथपणाची भीती उतरली होती.
गणेश व्यंकटेश शिंदे हे आज एक समर्पित साहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविणे आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाची गोडी निर्माण करणे, हेच त्यांच्या जीवनाचे लक्ष्य. मात्र, त्यांना हे यश सहज मिळालेले नाही. यामागे उभे गिरीश प्रभुणे काकांसारखे एक महान व्यक्तिमत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून टाका, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.
भटके-विमुक्तांसाठी कार्य सुरु केल्यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासोबत प्रारंभीपासून असलेले त्यांचे सहकारी म्हणजे महादेवराव गायकवाड. गिरीशजी आणि महादेवराव या दोघांचेही भटके-विमुक्तांच्या विकासात मोलाचे योगदान आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महादेवराव गायकवाड यांनी गिरीश प्रभुणे यांच्या सहवासातील काही संघर्षमय तर काही गमतीशीर आठवणींना पत्रातून दिलेला उजाळा...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा इतिहास जाणून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वेस्टर्न रिजन मिनिस्टर्स कॉन्फरन्स ऑन सिव्हिल एव्हिएशन’ मुंबईत संपन्न झाली.
मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल करणे संजय राऊतांना चांगलेच महागात पडले आहे. संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा मंत्री शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे सगळे प्रकार उघड केल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी होईल, असेही ते म्हणाले.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ ऑक्टोबर दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
युरोपीयन राष्ट्र हंगेरी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुडापेस्टच्या भारतीय दूतावासातील अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्रात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण कला सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून त्यांच्या कला-साधनेप्रती असलेली निष्ठा आणि गुरूविषयी असलेली भक्ती स्पष्टपणे दिसून आली.
उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या कावड यात्रेदरम्यान योगी सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. राज्यात तसेच यात्रा मार्गावर कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण मार्गावर २९ हजार ४५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून ५० हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
(Radhika Yadav Case) हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची गुरुग्राम येथील राहत्या घरी वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी वडील दीपक यादव यांनी हत्येबद्दल पश्चातापही व्यक्त केला आहे. दीपक यादव यांचे भाऊ विजय यादव यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. "आरोपी दीपक यादव यांना पश्चाताप होत असून त्यांनी फाशी मिळावी, असा एफआयआर लिहिण्याची पोलिसांना विनंती केली आहे", ते म्हणाले.
हिंदू परंपरेत विवाह केवळ एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आणि सात जन्मांचं नातं मानलं जातं. हा विवाह केवळ त्या दोन व्यक्तींचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजालाही जोडणारा एक महत्त्वाचा बंध असतो. त्यामुळे पूर्वीपासून धर्म, कर्तव्य आणि समाजात संतुलन राखण्याच्या दृष्टीने विवाह संस्काराला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल अनेक विवाहांमध्ये आधुनिकतेच्या आग्रहापायी पारंपरिक विधी कमी प्रमाणात होत असले, तरी अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा सर्व भारतीय परंपरा आणि विधींसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अयोध्येच्या श्रीराम मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या शेषावतार मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना झाल्यानंतर ध्वजदंडही नुकताच स्थापित करण्यात आला. शेषावतार मंदिर लक्ष्मणजींना समर्पित असून येणाऱ्या भाविकांना लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे अद्भुत दर्शन घेता येणार आहे. शेषावतार हे लक्ष्मणजींचेच एक अवतार मानले जातात. म्हणूनच श्रीराम जन्मभूमी परिसरातील सर्वात उंच स्थळी शेषावतार मंदिर उभारले जात आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी त्या फेटाळून लावल्या आहेत. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात बा
भारताने २०२४ मध्ये आपल्या सागर (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) दृष्टिकोनातून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भूमिका अधिक बळकट केली असून, या क्षेत्रातील शांतता, स्थिरता व समृद्धीसाठी भारताची महत्त्वपूर्ण जबाबदारी अधोरेखित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२४च्या वार्षिक अहवालात तसे नमूद करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील विशेष खासदार/आमदार न्यायालयात आपण 'निर्दोष' असल्याचे सांगितले.
(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर
एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाची दोन्ही इंजिने उड्डाणानंतर काही सेकंदांच्या आत बंद पडल्याने अपघात झाला, असे अपघात तपासाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हिंसा हे मुख्य धोरण असलेल्या नक्षलवादामध्ये प्रांतवाद आणि वर्चस्ववाद ठासून भरलेला आहे. समानता, वर्गसंघर्ष, आणि अन्यायाविरोधात लढ्याच्या गोंडस घोषणा करणारे हे नक्षलवादी प्रत्यक्षात मात्र “आम्हीच श्रेष्ठ” या मानसिकतेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होत विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे वितरित केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी युवकांना शुभेच्छा देत देशसेवेच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
जागतिक शक्ती संतुलन नव्याने रचले जात असताना २०२५ सालामधील ‘ब्रिक्स’ परिषद ही नव्या युगाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. अमेरिका केंद्रित जागतिक व्यवस्थेला पर्याय उभारण्याच्या दिशेने ‘ब्रिक्स’ची वाटचाल अधिक ठाम होते आहे. अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका केवळ सहभागी सदस्य म्हणून नव्हे, तर विचारप्रवर्तक आणि सूत्रधार म्हणून अधिक व्यापक होते आहे. २०२५ साली झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या विविध पैलूंचा घेतलेला आढावा...
शहरी नक्षलवादाच्या वाढत्या विषवल्लीला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक’ दोन्ही सभागृहामध्ये पारित करून घेतले. या कायद्यामुळे शहरी नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी दंडशक्तीला कायद्याचे बळ मिळणार आहे. या विधेयकांवरूनही विरोधकांनी राजकारण केलेच. मात्र, काहीही असले तरीही हे विधेयक राज्यातील शहरी नक्षलवाद्यांच्या निरंकुश व्यवहारांना चाप लावेल हे नक्की. या विधेयकातील तरतुदी, सरकारची मानसिकता आणि त्यातील बारकावे यांचा घेतलेला आढावा...
आशिया खंडातील महासत्ता असण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन व्यापाराच्या मार्गे कूटनीतीचे जाळे पसरणार्या चीनला आजवर फक्त भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत त्याच्या सर्वांगीण प्रगतीने आशिया तसेच आशिया बाहेरही एक प्रमुख पुरवठादार सहकारी म्हणून उदयास येत आहे. भारताच्या या प्रगतीमुळे चीनची अस्वस्थता वाढली असून, विविध मार्गांनी भारताच्या प्रगतीला बाधा निर्माण करण्याचा चीन आटोकाट प्रयत्न करतो. चीनच्या या मार्गांचे आणि भारताची त्याबाबत रणनीती काय असावी याचा घेतलेला आढावा...
नाटक कलाकाराचे चरित्र घडवते. त्याची सर्वांगीण प्रगती नाटकामुळे होते. जीवनातील विविध क्षेत्रांवर नाटकाचा प्रभाव पडतो, त्याचा फायदा नक्कीच कलाकाराला आयुष्यात सर्वत्र होतोच. बालनाट्यामध्ये भूमिका साकारणार्या कलाकारांच्या आयुष्यात नाटकाच्या प्रभावाचा त्यांच्याच भाषेत घेतलेला आढावा...
कलाविश्वाचा झगमगाट म्हणजे यश, प्रसिद्धी आणि ‘ग्लॅमर’ असे एक समीकरण. पण, या झगमगाटामागे कित्येक कलाकारांचे मन झुंजत असते अपेक्षांच्या ओझ्याशी, इंडस्ट्रीमधील अस्थिरतेशी आणि अगदी खाऊन उठणार्या एकटेपणाशीही! मराठी कलाकार तुषार घाडीगावकर याने नुकत्याच आत्महत्येच्या उचललेल्या टोकाच्या पावलानंतर, पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील पडद्यामागचा हा अंधार उजेडात आला. तुषारने संपवलेला जीवनप्रवास ही घटना केवळ एका कलाकाराचे दुःख नाही, तर संपूर्ण सिनेसृष्टीला विचारप्रवृत्त करायला लावणारा आरसा आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक स्थळे आहेत, ज्यांना ही कीर्ती प्राप्त होणे आवश्यक आहे, तर काहींना ती लाभली आहे. त्यापैकी एक म्हणजे वेरूळ येथील कैलास लेणी. या लेण्यांबाबत असणारे कुतूहल आजही कायम आहे. हे लेणी म्हणजे तत्कालीन स्थापत्य प्रगतीचा जिवंत नमुनाच! या लेण्यांच्या स्थापत्य सौंदर्याचा घेतलेला आढावा...
सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण भारत
सैनिकी जीवन जगण्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण करून, निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेत ते पूर्ण केले. देशसेवा ते समाजसेवा असा प्रवास करणार्या रंगनाथ कीर्तने यांच्याविषयी...
जगभरात ६५ दशलक्ष कंटेनर सक्रिय वापरात असून, प्रामुख्याने भाडेपट्टा कंपन्यांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. हे कंटेनर शिपिंग उद्योगाचा आधारस्तंभ बनले आहेत. सागरी मालवाहतुकीचे प्रमाण सामान्यतः मेट्रिक टन किंवा TEUs (२० फूट समतुल्य युनिट्स) मध्ये मोजले जाते, जे २० फूट कंटेनरच्या लांबीवर आधारित असते. हे युनिट कंटेनरची क्षमता, कंटेनर जहाज किंवा टर्मिनलची क्षमता मोजण्यासाठी एक प्रमाण आहे. सागरी वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनेक प्रकारचे कंटेनर वापरले जातात. प्रत्येक कंटेनर वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतुकीसाठी डिझ
आजकाल ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे बघायला मिळत असताना, अनेक संस्था आणि व्यक्तीदेखील त्यांच्या हितासाठी पुढे येत आहेत. मात्र, हे प्रयत्न अतिशय तुटपुंजे असल्याचेही मान्य करावे लागेल. एका आकडेवारीनुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही २०५० सालापर्यंत, भारतातील एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के असणार आहे. कालच ’लोकसंख्या दिनी’ जी लोकसंख्यावाढीबाबत आलेली आकडेवारी धक्कादायक अशीच. यामध्ये वाढ होणार असून, ती १४८ कोटींवर जाईल. पुण्याच्या दृष्टीने विचार करता, अलीकडील काळात झपाट्याने प्रगती करणार
जगाच्या इतिहासात अनेक शूरवीरांची यादी आहे, ज्यांच्या अचाट पराक्रमाने शत्रूपक्षालाही आश्चर्याने बोटे तोंडात घालायला भाग पाडले. प्रसंगी अशा शूरांनी हौतात्म्य पत्करले किंवा मातृभूमीचा सर्वोच्च गौरव त्यांना मिळाला. मात्र, पाकिस्तानमध्ये असे काहीही झाले नसताना लष्करप्रमुख मात्र ‘फील्ड मार्शल’ झाले. त्याच कहाणीचा हा आढावा...
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले. त्यांनी ज्या निर्भीडपणे काँग्रेसी हुकूमशाहीवर परखड भाष्य केले आहे, ते काँग्रेसला कधीही पचनी पडणार नाही.