मराठी मनोरंजनसृष्टीतील मानाचा मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर (Filmfare Marathi Awards 2024) पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात कोणते चित्रपट बाजी मारणार आणि कोण सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Marathi Awards 2024) ‘आत्मपॅम्फलेट’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पटकावला असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार आशिष बेंडे यांनी मिळवला आहे.
Read More
मराठी चित्रपटांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांना जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. २०२३ या वर्षात हिंदी चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ने (Baipan Bhari Deva) ९० कोटींचा टप्पा गाठला. आता केदार शिंदे पुन्हा एकदा स्त्रीयांचीच गोष्ट मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत पण यावेळी ती फक्त आईची कथा असणार आहे.
झी गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav) सोहळा प्रत्येक कलाकारांसाठी मानाचा पुरस्कार सोहळा आहे. ५ मार्च रोजी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या आणि प्रेक्षकांची मने जिकंणाऱ्या कलाकारांना पुरस्काराच्या स्वरुपात त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. यंदाच्या झी चित्र गौरव (Zee Chitra Gaurav) पुरस्काराचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. साधारणत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एक किंवा दोन जणांमध्ये विभागून दिला जातो. पण यावेळी हा पुरस्कार (Zee Chitra Gaurav) एक दोन नव्
तर अभिनेत्री सुकन्या मोने यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव वेगळंच ठेवण्यात आलं होतं. सुकन्या यांचा जन्म मुंबईत झाला. सुकन्या यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब चाळीतून थेट ब्लॉकमध्ये राहायला गेले. लेकीचा जन्म होताच चाळीतून मोठ्या घरात गेल्यामुळे वडिलांनी त्यांचं नाव धनश्री असं ठेवलं. धनाची पेटी अशा आशयाने त्यांनी धनश्री हे नाव ठेवलं होतं. पण त्यांच्या आईला मात्र हे नाव आवडलं नाही. त्यामुळे आईने मुलीचं नाव सुकन्या असं ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणेच त्यांनी मोठं व्हावं अशी आईची इच्छा होती. कालांतराने सुकन्या यां
मराठी चित्रपटांकडे तशी आशय आणि विषयांची कमतरता नाही. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने खर्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ या वर्षाची दणक्यात सुरुवात केली. ‘बॉक्स ऑफिस’वर इतर भाषिक चित्रपटांच्या सोबतीने भरघोस कमाई करीत मराठी चित्रपटांसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. पण,
केदार शिंदे दिग्दर्शितक बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे ‘आता वेळ झाली’. या मराठी चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे.
एखादा दिग्दर्शक त्याच्या यशस्वी चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आला की उगाचच त्यांच्या राजकारणातल्या पदार्पणाच्या चर्चा रंगू लागतात. अशीच चर्चा आता दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाबतीत रंगू लागली आहे. केदार शिंदे राजकारणात प्रवेश करणार का आणि केला तर कोणत्या पक्षात करणार आणि कोणाला पाठींबा देणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वत: केदार शिंदे यांनी दिली आहे.