प्रविण तरडेंची मोजक्या शब्दात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सूचक पोस्ट

    13-May-2024
Total Views |
pravin  
 
 
पुणे : देशात आज १३ मे रोजी लोकसभा निवडणूक २०२४ साठी चौथ्या टप्प्यातील होत आहे. महाराष्ट्रात पुणे, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये मतदान होत असून अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarade) यांनी पुण्यातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी एक विशेष सूचक (Pravin Tarade) पोस्ट केली आहे.
 
मुरलीधर मोहोळ आणि प्रविण तरडे यांची खूप चांगली मैत्री आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रचारसभेतही प्रविण तरडे यांनी जोरदार भाषण मोहोळ यांच्यासाठी केले होते. आणि आता तरडेंनी फक्त दोनच शब्दांची फेसबुक पोस्ट केली आहे. ‘शहरभर मुरलीधर’ ही तरडेंची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. 
 

pravin  
 
दरम्यान, पुण्यातील प्रचार सभेत प्रविण तरडे म्हणाले होते की, “कलाकाराच्या पाठिशी एखाद्या पक्षाने किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातील प्रत्येक कलाकाराने अनुभवलेलं आहे, त्यामुळे मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भाजपाने पुणे शहराला दिलं आहे. त्याला आपल्याला भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट ज्या लीडने जिंकून आले होते त्याच्यापुढे जाऊन जास्त मतदान करा. आपल्या मुरली अण्णाला मोठ्या डौलात दिल्लीत पाठवा. मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट मुळशीतून मानगाव मार्गे रायगडला नेली, त्यांच्या पत्रात उल्लेख आहे की अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचली, तो मुळशीतला मावळा आज मोदींनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मुळशीचा हा प्रामाणिकपणा सर्वदूर न्यायचा आहे, अशी हात जोडून विनंती”.