मुंबई दि. ७, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘संगीत संयुक्त मानापमान’ या नाटकाच्या प्रयोगास 8 जुलै रोजी १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सांस्कृतिक संचालनालयाकडून शुक्रवार ७ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रयोगास १०१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ऐतिहासिक प्रयोगाच्या इतिहासाचे नाट्य रुपांतर लेखक अभिराम भडकमकर यांनी केले आहे. तसेच हृषीकेश जोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. राहुल देशपांडे, आर्य आंबेकर, संपदा माने व अजिंक्य पोंक्षे यांनी गीते सदर केली. राजीव परांजपे यांनी संगीत दिग्दर्शन केले होते, प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य व प्रकाशयोजना पहिली तर गीता गोडबोले एनीवेधभुषा पहिली होती.