सावरकरांनी २५ वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपड केली! तरीही हिंदू एक होत नाही यासारखं दुःख नाही!

    18-May-2023
Total Views |
sharad ponkshe 
 
मुंबई : मे महिन्यातील २८ तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असते. त्या धर्तीवर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सावरकर प्रेमींमध्ये सावरकर वारे वाहू लागलेले असतात. अशातच अनेक सावरकर प्रेमी त्यांचे गुणगान गाणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर करत असतात. अशातच अभिनेते शरद पोंक्षे यांनी सुद्धा सावरकरांचे 'काळे पाणी' हे पुस्तक वाचत सावरकरांची हिंदुत्ववादी मते या व्हिडीओ मध्ये सांगितली आहेत.
 
शरद म्हणतात, "सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील उभारणीची वर्षे तुरुंगात काढली परंतु त्यांनी सर्व हिंदूंना एकत्र आणायचा प्रयत्न केला. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी हिंदूंच्या एकजुटी खर्च केलं. परंतु अजूनही काहीही उपयोग झाल्यासारखे वाटत नाही. आपण सावरकर वाचायला हवेत. सावरकरांनी २५ वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपड केली! तरीही हिंदू एक होत नाही यासारखं दुःख नाही!" असं म्हणताना ते म्हणतात, "सावरकर वाचू सावरकर समजून घेऊ सावरकर जगू.आणि हिदू एकच जात तयार करू."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.