जमीन – नोकरी घोटाळा – लालूंसह पत्नी आणि मुलीस जामीन मंजुर

    15-Mar-2023
Total Views |
 
Lalu Prasad Yadav
 
 
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीस जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी बुधवारी जामीन मंजुर झाला आहे.
 
लालू प्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देऊन मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामध्ये लालूंसह त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारतीसह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचाही सहभाग असल्याचा ठपका ठेवला आहे. त्याविषयी गेल्या आठवड्यात छापेमारीदेखील झाली होती.
 
याप्रकरणी बुधवारी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडे देवी आणि राजदच्या खासदार असलेली त्यांची मुलगी मिसा भारती यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिघांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे.
 
यापूर्वी 6 मार्च रोजी सीबीआय पाटणा येथील राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचली होती, जिथे त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ७ मार्चला सीबीआयचे पथक मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. येथे सीबीआयने घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर तीन दिवसांनी ईडीच्या पथकाने लालू यादव, तेजस्वी यादव आणि त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या जवळपास 15 ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान ईडीने दावा केला होता की, तपासादरम्यान 600 कोटींच्या आर्थिक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.