IPL 2021 : बायो बबलचे कारण देत 'या' सीएसके खेळाडूची माघार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2021
Total Views |

CSK_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या सुरुवातीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने माघार घेतली आहे. ऑस्ट्रलियाचा मध्यमगती गोलंदाज जोश हेजलवूड याने स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. आगामी 'टी-२० विश्वचषक' आणि 'अ‍ॅशेस मालिका' डोळ्यासमोर ठेवून त्याने हा निर्णय घेतला आहे. यावेळी त्याने सांगितले की, "बायो बबलपासून दूर, आपल्या कुटुंबासोबत राहण्याचदेखील त्याची इच्छा आहे."
 
 
हेजलवूडने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, "बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात 'क्वारंटाईन' राहून गेले दहा महिने उलटले. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरेच क्रिकेट खेळायचे आहेत. आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, 'टी-२० विश्वचषक' आणि नंतर 'अ‍ॅशेस मालिका'. यामुळे पुढील १२ महिने अतिशय व्यस्त असतील. या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहायचे आहे. म्हणून मी 'आयपीएल' स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला."
 
 
'आयपीएल'मधून माघार घेणारा हेजलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. यापूर्वी जोश फिलिपे आणि मिचेल मार्श यांनी 'आयपीएल'मधून माघार घेतली. 'आयपीएल'दरम्यान एवढा काळ आपण बायो-बबलमध्ये राहू शकत नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे मार्शनेदेखील सांगितले होते. मार्शने याबाबत 'बीसीसीआय' आणि सनरायजर्स हैदराबादला याबाबत माहिती दिली.
@@AUTHORINFO_V1@@