अभिनय बेर्डेच्या 'मन कस्तुरी रे' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण

    15-Feb-2021
Total Views | 68

film_1  H x W:
 
 
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीचा तरुण अभिनेता अभिनय बेर्डे याच्या 'मन कस्तुरी रे' या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. त्याने सोशल मिडीयाद्वारे अशी माहिती दिली. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक संकेत माने हे आहेत. तर सुमित गिरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहीले आहेत. 'इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस', 'वेंकट आर. अट्टीली' आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
 
 
 
चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना चित्रपटाचे लेखक - दिग्दर्शक संकेत माने म्हणाले, "कोरोना काळात अतिशय सावधानता बाळगून 'मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच सिनेमा आहे. तसेच अभिनय बेर्डे हा गुणी अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव अप्रतिम होता. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईमधील लालबाग, भांडूप, ठाणे, मिरारोड अशा गर्दीवाल्या ठिकाणावर करण्यात आले. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांच्या सोबतचे अनुभव अविस्मरणीय होते. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला उत्सुक आहोत."
 
 
 
अभिनेता अभिनय बेर्डे चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगतो, "लेखक-दिग्दर्शक संकेत माने यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. स्वतःच्या अभिनयावर अभ्यास करता आला. मुंबईतल्या गर्दीवाल्या ठिकाणावर चित्रीकरण करतानाचा अनुभव अविश्वसनीय होता. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे निर्मित, संकेत माने दिग्दर्शित - लिखीत, ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटात अभिनय बेर्डे झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121