सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे!

    दिनांक  19-Aug-2020 11:45:45
|
sushant_1  H x

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचे पालन करावे लागेल, असेही कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे.


सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकते. पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारला असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचे कळते आहे.


या प्रकरणी ११ ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर १३ ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला. सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.