सुशांतच्या बातमीवर ‘माही’ झाला सुन्न !

    दिनांक  15-Jun-2020 18:34:02
|

Dhoni sushant_1 &nbs
नवी दिल्ली : रविवारी दुपारची वेळ ही सगळ्या देशाला सुन्न करून गेली. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हळहळला. अवघ्या ३४व्या वर्षी त्याने हे पाउल उचलल्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘महेंद्रसिंग धोनी – दि अनटोल्ड स्टोरी’. यामध्ये त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका निभावली होती. यावर आता धोनीची प्रतिक्रिया समोर आली असून धोनीचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी ‘सुशांतची बातमी ऐकल्यानंतर माहीदेखील सुन्न झाला आहे.’ असे सांगितले. धोनीच्या जीवनपटादरम्यान सुशांत आणि धोनीचे घरगुती संबध निर्माण होते.
 
रविवारच्या दिवशी धोनी परिवाराकडून कुठलीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. मात्र अखेर महेंद्रसिंग धोनीचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, “सुशांतच्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही आहे. शोक कसा व्यक्त करावा हेच मला कळत नाही आहे. ही घटना खूपच नाट्यमय आहे. सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात, पण त्याच्या पुढ्यात एक उज्ज्वल भविष्य होते याची मला खात्री होती. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून महेंद्रसिंग धोनी खूपच खिन्न झाला. त्याच्या मृत्यूचा खूपच धक्का बसला आहे.”
 
महेंद्रसिंग धोनी याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उभारण्यासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. याचदरम्यान त्याने धोनिसार्खेच क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धोनीच्या कुटुंबाशी त्याचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते. तसेच, सुशांतने साकारलेल्या महेंद्रसिंग धोनीचे खुद्द महिनेदेखील कौतुक केले होते. अशामध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्व क्रीडाक्षेत्रातून अनेकांनी रविवारी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर सोमवारी धोनीची प्रतिक्रिया सर्वांसमोर आली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.