घटस्फोटाच्या नोटीसीनंतर नवाजुद्दीनच्या पत्नीने केले गंभीर आरोप!

    दिनांक  23-May-2020 14:29:33
|

Navajuddin siddiqui_1&nbsनवाजुद्दीनच्या कुटुंबियांकडून मारहाण सहन करत होती आलिया सिद्दीकी


मुंबई : प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आलिया सिद्दिकी अर्थात नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. आता मी घाबरणार नसून, स्पष्टपणे सगळ्या गोष्टी जाहीर करणार असल्याचे तिने म्हंटले आहे.


प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनच्या पत्नीने दीर आणि सासरच्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे. तर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून नवाजुद्दीन आणि ती वेगेळे राहत असल्याचा गौफ्यस्फोटही तिने केला. ती मुलांसह वेगळी राहत असून, तो शेवटचा मुलांना भेटायला कधी आला होता हे देखील आतःवत नसल्याचे म्हणत तिने आपले दुःख व्यक्त केले. खूप सहन केले आता बस झाले म्हणत तिने घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे.


यावर नवाजुद्दीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो सध्या त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी परतला असून, तिथे त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. या आधीही नवाजुद्दीनचा घटस्फोट झाला असून, हे त्याचे दुसरे लग्न होते. घटस्फोटाच्या बातम्यांनंतर आलिया सिद्दीकीचे काही फोटो व्हायरल झाले. त्याफोटोवरून तिचे अफेअर असल्याचे देखील म्हंटले गेले. मात्र यावर उत्तर देताना तिने सांगितले की ते फोटो चुकीच्या पद्धतीने कॉर्प करण्यात आले असून, त्यात आणखी काही लोकसुद्धा होते.


मुलांसमोर होणारी सततची भांडणे, नवाजुद्दीनकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणारा शारीरिक अत्याचाराला कंटाळून आपण घटस्फोट घेत असल्याचे आलिया सिद्दीकीने म्हंटले आहे. आलिया आणि नवाजुद्दीनच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली होती. मात्र आता हे त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.