सोशल मिडीयावर पसरल्या नसिरुद्दीन शाह रुग्णालयात असल्याच्या अफवा!

    01-May-2020
Total Views | 115

nasiruddin shah_1 &n



‘बाबा ठीकअसून, घरीच आहेत’, नसिरुद्दीन शाहांच्या मुलाचे स्पष्टीकरण



मुंबई : गेल्या दोन दिवसात बॉलीवूडने दोन दिग्गज तारे गमावले. या धक्क्यातून चाहते आणि प्रेक्षक सावरत असतानाच शुक्रवारी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. नसिरूद्दीन शहा यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या.


सर्वात आधी २८ एप्रिल रोजी इरफान खान यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ एप्रिलला इरफान खान यांचे निधन झाले. त्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयात दाखल केले. ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले आणि या अफवेमुळे बॉलिवूडसह देशातील लोक सुन्न झाले. पण नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती ठीक असून ते घरीच असल्याचे स्पष्टीकरण त्यांचा मुलगा विवानने ट्विट करत दिली आहे.





विवान शाहने ट्वीट करत म्हटलेय की, ‘सर्व ठीक आहे. बाबा एकदम ठीक आहेत. त्यांचं स्वास्थ बिघडल्याच्या सर्व अफवा आहेत. त्यांनी इरफान भाई आणि चिंटूजीसाठी प्रार्थना केली आहे. दोन्ही कुटुंबाविषयी शोक व्यक्त केला. दोघांच्या आत्मास शांती लाभो.’ तर स्वतः नसिरुद्दीन यांनीही ट्विट करत आपण ठीक असून घरीच असल्याचे सांगितले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121