आता मिताली राजचे आयुष्य मोठ्या पडद्यावर... शाबाश मिथु !

    दिनांक  29-Jan-2020 13:50:15

Mithali-biopic_1 &nb
मुंबई : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि संघाचा महत्वाचा दुवा असलेली मिताली राज. आता हीच जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार असून तापसी पन्नू तिची भूमिका बजावणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. कुठल्याही महिला क्रिकेटपटूवर हा पहिलाच जीवनपट आहे. मिताली राजने भारतीय एकदिवसीय महिला क्रिकेट संघ तसेच कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. क्रिकेटमधील तिच्या कारकिर्दीला २०हुन अधिक वर्ष झाली आहेत.
 
 
 
मिताली राजच्या जीवनावर आधारित हा सिनेमा ५ फेब्रुवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीने तिच्या सोशल मीडियावर ‘शाब्बास मिथू’चा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की , “मला नेहमीच विचारले जाते की तुझा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण आहे? पण खरे तर असे विचारायला हवे की तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण?” हे त्या व्यक्तीचे वक्तव्य आहे जिने प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हा विचार करण्यास भाग पाडले की तो क्रिकेटवर प्रेम करतो की ते खेळत असणाऱ्या खेळडूंवर. कर्णधार, तुम्ही नेहमीच अल्टीमेट गेम चेंजर राहाल.’
 
मिताली राजने ३२ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यात २०१२, २०१४ आणि २०१६ या तीनही विश्वचषक स्पर्धांमध्ये कर्णधारपद भूषवले. २००६मध्ये महिला संघाने पहिला टी-२० सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीने ८९ टी-२० सामने खेळले. यामध्ये तिने २३६४ धावा केल्या, ज्यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे. ९७ हा मितालीचा टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली. तिने ३ सप्टेंबर २०१९ मध्ये टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.