'गुगल' सर्चमध्येही 'तानाजी'चा विक्रम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |
Tanaji _1  H x



वेब डेस्क : बॉक्स ऑफीसवर 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असताना आता गुगल ट्रेंडमध्येही तानाजी सर्वात पुढे असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'तानाजी' हा 'दीपिका' आणि 'छपाक' या दोन्ही शब्दांपेक्षा जास्त सर्च केल्याचे गुगल आकडेवारी सांगते.

 

७ जानेवारी रोजी दिपीका पदुकोणने जेएनयूत सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर सगळीकडे दीपिका आणि तिच्या 'छपाक' या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. काहींनी दीपिकाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले तर काहींनी दीपिकाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. या सर्व घडामोडींमध्ये अभिनेता अजय देवगण याचा 'तानाजी' चित्रपटाची चर्चा तितकीशी नव्हती. मात्र, अजय देवगण टीव्ही सिरिअल्स, मालिका आणि इतर माध्यमांतून चित्रपटाचे प्रमोशन करत होता. दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र, संपूर्ण चित्रच पालटून गेले. 'छपाक'ला बॉक्स ऑफीसवर तितकीशी कमाई करता आली नाही. 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' हा चित्रपटाने प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली.

 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. ७ जानेवारीपर्यंत 'छपाक'ला ४७ अंकांची सर्वाधिक सर्चिंग मिळाली होती. मात्र, 'तानाजी'ला रविवारपर्यंत शंभर अंकांपर्यंत सर्चिंग मिळाली होती. ७ जानेवारी ते १३ जानेवारीपर्यंतच्या गुगलच्या आकडेवारीवर लक्ष दिल्यास 'छपाक'पेक्षा युझर्सनी जास्त सर्च केल्याचे दिसून येत आहे.

 

दीपिका जेएनयूत गेल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांवर तिचीच चर्चा होत होती. मात्र, सोशल मीडियावर यापेक्षा सर्वात जास्त चर्चा तानाजी या चित्रपटाची होत होती. गेल्या सात दिवसांत तानाजीला ३० अंक, छपाकला २२ अंक, दीपिकाला १७ अंक, अजय देवगणला १५ अंक इतक्या प्रमाणात सर्च करण्यात आले होते. तानाजीला ११ जानेवारी रोजी ८९ अंक, १२ जानेवारीला १०० अंक आणि १३ जानेवारी रोजी ८३ अंक इतक्या प्रमाणावर सर्च करण्यात आले होते. 'छपाक' चित्रपटाची सर्वात जास्त सर्चिंग ही ८५ अंकांपर्यंतच मर्यादीत राहीली होती.
 

कुठल्या राज्यांत सर्वाधिक 'सर्च' झाला तानाजी ?

राज्य टक्केवारी

   · दीव दमण ६४ टक्के

   · दादरा नगर हवेली ६४ टक्के

   · महाराष्ट्र ४९ टक्के

   · गोवा ४४ टक्के

   · गोवा ४४ टक्के

   · गुजरात ३९ टक्के

 

'छपाक'ला सर्वाधिक 'सर्च' झालेली राज्ये

राज्य     टक्केवारी

· पुड्डुचेरी    ४७ टक्के

· सिक्कीम     ४६ टक्के

· नागालॅण्ड    ४१ टक्के

· त्रिपूरा     ३८ टक्के

· उत्तराखंड     ३५ टक्के

 

'तानाजी'चे कलेक्शन कीती ?

'तानाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर किती गल्ला मिळवला हे जाणून घेण्याचीही बऱ्याच जणांना इच्छा होती. याशिवाय युझर्सतर्फे तानाजी रिव्हू, छपाक, तानाजी मूव्ही, बॉक्स ऑफीस, तुकडे तुकडे गॅंग, जेएनयू प्रोटेस्ट, दीपिका पदुकोण, जेएनयू आदी शब्दही शोधण्यात आले.










@@AUTHORINFO_V1@@