नाशिकमध्ये दरोडा : मुत्थुट फायनान्सच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

    दिनांक  14-Jun-2019


 


नाशिक : नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून चोरी-दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी भरदिवसा नाशिकमधील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकला. या कार्यालयात लूटमार करताना दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यामध्ये एक कर्मचारी ठार झाला असून ३ कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

 

सकाळी ११च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून हे दरोडेखोर मुथूटच्या कार्यालयात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करत धोक्याचा अलार्म वाजवल्याने लुटारुंनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात सजू सॅम्युअल यांनी त्यांना विरोध केल्यानंतर एका दरोडेखोराने त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. नंतर कार्यालयातील एकाच्या डोक्यावर बंदुकीच्या बटाने प्रहार करत व्यवस्थापकालाही मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat