मुंबई : मॅडॉक फिल्म्स निर्मित असलेला 'छावा' चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 'छावा' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला आजपासुन सुरवात झाली असून तिकीटाचा दर अधिक असल्याचे दिसत आहे.
बुक माय शो या तिकीट बुकींग साइटवर गेल्यास छावा चित्रपटाच्या मॉर्निंग शो चे तिकीट ३०० ते ३५० च्या दरात विकले जात आहे. साधारणत: मॉर्निंग शो चे तिकीट स्वस्त दरात विकले जातात. मात्र छाव्या च्या पहिल्या शो चे तिकीट २०० ते ४०० च्या दरात असणार आहे. पी.वि.आर आणि आय.ओन.एक्स यांसारख्या थेएटर्समध्ये ४५० ते ५०० पर्यंत तिकीट विक्री केली जाणार आहे.
छावा च्या मेकर्सने एक घोषणा केल्याप्रमाणे, छावा आत्ता आयमॅक्स मध्येही पाहता येणार आहे. मात्र प्रेषकांना याची मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. आयमॅक्स मध्ये चित्रपट पाहण्यासाठी ५०० ते ८०० रुपयांपर्यंत तिकीटं उपलब्ध आहेत.