भारताचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांवर दगडफेक; ७ जणांना ठोकल्या बेड्या!

    24-Feb-2025
Total Views | 53

Stone Pelting in Ahmedabad after India Victory over Pakistan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Stone Pelting in Ahmedabad) 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सध्या दुबई येथे होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. याचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीयांवर दगडफेक झाल्याची घटना अहमदाबाद येथे घडली. यात अनेकजण जखमी झाले असून एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत एकूण ७ जणांना अटक केली आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशचे युनूस सरकार शरीया कायद्याप्रमाणे चालणार?

अहमदाबादच्या खोखरा भागात असलेल्या अनुपम सिनेमाजवळ काही लोक फटाके फोडून घोषणाबाजी करत आनंद साजरा करत होते. दरम्यान त्यांच्यावर एका इस्लामिक कट्टरपंथींच्या जमावाने दगडफेक केली. मिळालेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला फटाके फोडल्याप्रकरणी वाद निर्माण झाला. त्यानंतर एका इस्लामिक कट्टरपंथीने १५ ते २० लोकांचा जमाव गोळा करून दगडफेक करण्यास सुरुवात केली. स्थानिकांच्या मते या हल्ल्यात ६ ते ७ जण जखमी झाले असून एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा तैनात करून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121