‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

    19-Sep-2024
Total Views | 34

sabarmati report  
 
 
मुंबई : अभिनेत्री राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटात राशी एका रिपोर्टरची भूमिका साकारत असून हा चित्रपट साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित आहे.
 
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, "ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! #TheSabarmatiReport फक्त सिनेमागृहात!"
 

sabarmati report  
 
रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचा तपशीलयात दाखवला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी देखील महत्वपुर्ण भूमिका साकारणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121