‘धर्मवीर २’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार श्रीकांत शिंदेंची भूमिका

    23-Jul-2024
Total Views | 72

dharmaveer 2 
 
 
मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवरही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ बद्दल अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याचा उलग़डा झाला आहे.
 
रेगे या पहिल्याच चित्रपटात ज्याला प्रसिद्धी मिळाली तो अभिनेता आरोह वेलणकर या चित्रपटात खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणार आहे. आरोहने मराठी नाटक, चित्रपटांबरोबरच यापूर्वी ‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच, नुकताच तो कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘चंदु चॅम्पियन’ या चित्रपटातही झळकला होता.
अभिनेता आरोह वेलणकरने श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर फोटो शेअर करत “रील वर्सेस रीअल…या चित्रपटाचा एक भाग होता आलं याचा मला कायम आनंद असेल” असं कॅप्शन दिलं आहे. आरोहने शेअर केलेल्या फोटोवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
 

aaroh 
 
दरम्यान, ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत ‘धर्मवीर २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121