हार्बर मार्गावरील लोकल सुसाट धावणार

गाड्या ताशी ९५ किमी वेगाने धावणार

    26-Jun-2024
Total Views | 30

local


मुंबई, दि.२६ : प्रतिनिधी 
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे आता सुसाट धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील टिळकनगर-पनवेल विभागावरील गाड्या ताशी ९५ किमी वेगाने धावतील. त्यामुळे धीम्यागतीने धावणाऱ्या या लोकल रेल्वे आता सुसाट वेगात धावणार आहेत.
मध्य रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी विविध विभागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत. यामध्ये ट्रॅकचे मजबुतीकरण, ओव्हर हेड इक्विपमेंट फेरफार, सिग्नलिंगची कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील टिळकनगर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय गाड्यांचा विभागीय वेग ताशी ८० किमीवरून ९५ किमी प्रतितास केला आहे. ब्रेकिंग अंतर पुरेशा मर्यादांमुळे वेगात आणखी वाढ करणे शक्य नव्हते. यामुळे टिळकनगर-पनवेल विभागातील प्रवासाचा वेळ २ ते ३ मिनिटांनी कमी झाला आहे आणि वक्तशीरपणा सुधारला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवासाची सोय मिळावी यासाठी ट्रॅकची उत्तम दर्जाची देखभाल केली जात आहे. जुन्या मालमत्तेची पुनर्स्थापना देखील प्राधान्याने केली जात आहे. वेग वाढवण्यासाठी समतुल्य गती क्षमता असलेल्या रेकचा वापर केला जात आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर गाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे, असेही मध्य रेल्वेने सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121