उपनगरातील शौचालयांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामाला वेग!

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

    14-Mar-2024
Total Views | 95

Image


मुंबई :
मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यावर आधारित माहिती पुस्तिका तथा अहवालाचे प्रकाशन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात २९८७ पैकी १५०४ शौचालयांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ८५ टक्के शौचालयांची (१२७७) दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची (२२७) पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत.
 
यावेळी मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, उप जिल्हाधिकारी संदीप निशीत, महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
म्हाडा प्राधिकरणाने मुंबईत बांधलेली शौचालये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. या शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहेत.
 
मंत्री लोढा यांचा विकासासाठी पुढाकार!
 
मुंबई उपनगरातील रहिवाशांच्या दैनंदिन समस्या कमी करण्यासाठी मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाकडील ३,९१३ पैकी २,९८७ सार्वजनिक शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. यासाठी मुंबई उपनगरे जिल्हा नियोजन समितीकडून १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. म्हाडाने बांधलेल्या शौचालयाची विशेषतः झोपडपपट्ट्यामधील शौचालयांची अवस्था पाहता पुनर्बांधणी व दुरुस्तीची गरज होती. तसेच त्यातून परिसरात रोगराई पसरण्याची भीती होती. या शौचालयांची वेळीच दुरुस्ती करण्याची बाब लक्षात घेता मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हाडाकडील २९८७ शौचालये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पुढाकार घेतला.
 
वस्ती सुधार योजनेची कामेही प्रगतिपथावर!
 
मुंबई उपनगरे जिल्ह्यातील सार्वजनिक शौचालयात सध्या ७००४ इतकी शौचकुपे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वस्ती सुधार योजनेची लॉट १२ अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर हा आकडा ७००४ वरुन ११ हजार ७६९ पर्यंत नेण्यात येणार आहे. यासह सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठी देखील महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. तसेच आरसीसी प्रकारच्या शौचालयांचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येत्या २४ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचेही मंत्री लोढांनी म्हटले आहे.
 
अत्याधुनिक सुविधा मिळणार!
 
झोपडट्ट्यांतील नागरिकांसाठी सुविधा शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय कपडे धुण्यासाठी वाशिंग मशीन, सौर उर्जा, स्नानगृहे, स्वतंत्र शौचकुपे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळी उच्च दर्जाच्या सुविधा असलेली शौचालयेदेखील या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121