नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहले की," मोदीजींनी चंद्राच्या भागांना तिरंगा आणि शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे. आता अदानी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करेल आणि निविदा न काढता चंद्रावर सपाट पृथ्वीचे दर्शनी भाग बांधण्याचे अधिकार प्राप्त करेल. तिथे मुस्लिमांना परवानगी दिली जाणार नाही आणि फक्त शाकाहारीच राहतील"
इस्रोच्या चांद्रयान-३ च्या लँडिंगनंतर महुआ मोईत्रा यांनी लिहिले, 'होय, इस्रो चंद्रावर उतरले आहे. नरेंद्र मोदी चंद्रावर उतरले नाहीत याची आठवण भाजपला करून देऊ. तसेच भाजपच्या आयटी सेलने चांद्रयानामागे संशोधन तयार केलेले नाही." ,असे आक्षेपार्ह विधान मोईत्रा यांनी केले.
दरम्यान चांद्रयान-३ च्या चंद्र लँडिंगच्या स्मरणार्थ २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी केली. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या टचडाउन स्पॉटला यापुढे 'शिवशक्ती' पॉइंट म्हणून ओळखले जाईल, तर चांद्रयान-२ चंद्राच्या लँडिंग पॉइंटला 'तिरंगा' पॉइंट म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.