एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय
17-Aug-2023
Total Views | 138
मुंबई : मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्याद्वारे पुढील पाच ते पंचवीस वर्षांतील वाहतूक आणि त्या अनुषंगाने करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येणार असून यासोबतच वांद्रे-कुर्ला संकुलात ‘इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’ (आयटीएम) बसविण्याच्या दृष्टीने देखील अभ्यास करण्यात येणार आहे.
दररोज तेथे हजारो वाहनांची ये-जा बीकेसी परिसरातून होत असते. मात्र दिवसेंदिवस या वाहनांची संख्या अधिकाधिक वाढत असून त्यासोबतच रस्ते किंवा इतर वाहतुकीचे पर्याय विकसित होत नसल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा ही वाहतूक कोंडी दूर करता यावी यासाठी एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.