मुंबई : कंत्राट नसताना लाईफलाईन कंपनीतर्फे खरेदी करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या कोविड घोटाळ्या संदर्भात सुजित पाटकरांना अटक करण्यात आली आहे. राऊतांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पाटकर यांच्यावर कोविड काळात कंत्राट घोटाळा केल्याचा आरोप आहे. निविदा नसतानाही साहित्य खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीतर्फे १९ जुलैच्या रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक झाली आहे. ते दहिसर कोविड सेंटरचे इनचार्ज होते.
मात्र, सुजित पाटकरांच्या अटकेनंतर पुढचा नंबर कुणाचा? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांचीही चौकशी केली होती. त्यामुळे आता पुढील अटकेचा नंबर कोणाचा? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.