मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याताच काही दिवसांपुर्वी उबाठा गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूना एकत्र येण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स मुंबई शहरात लावले होते. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार अशी राजकीय वर्तळात चर्चा होती.
अशातच आता माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रीया दिली आहे. रामदास कदम म्हणाले की, मी स्वत: उध्दव ठाकरे यांच्याकडे दोन्ही भावांनी सोबत येण्याचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. पण ते शक्य झालं नाही. कारण उध्दव ठाकरे यांच्या घरच्या मंडळींना दोन्ही भाऊ सोबत आल्यास चालणार नाही.
पुढे बोलतांना रामदास कदम म्हणाले की, उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. ही काळ्या दगडावरची कोरलेली रेघ आहे. रामदास कदम हे एकेकाळी उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. सध्या ते शिवसेनेत आहेत.