राऊतांच्या अडचणी वाढणार! विधान परिषदेतही हक्कभंग समितीचे सचिवांना पत्र
21-Jun-2023
Total Views | 109
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बनावट शिवसेना असं म्हटलं होतं. तर हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात दोन वेगवेगळे हक्कभंग दाखल झाले होते. त्याला राऊत यांनी उत्तर ही त्यांनी दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा चोरमंडळ हा वाद विधान परिषदेत गेला आहे.
राऊतांची विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार देण्यात आली असून हक्कभंग समितीने विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखालील विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यसभेच्या सभापतींकडून अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.