मुंबई : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यातील काही संवादांवर आक्षेप घेतल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या संवादात बदल केला आहे. त्यातील आक्षेपार्ह संवाद वगळून नवीन संवाद त्यात वापरण्यात आले आहेत. यासंदर्भात चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, या चित्रपटातील आक्षेप घेतले गेलेले संवाद येत्या आठवड्यापर्यंत बदलून त्यात नव्याने संवाद वापरले जातील असे त्यांनी म्हटले होते. तसेच, प्रेक्षकांच्या भावनेपेक्षा आपल्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही, असेही मनोज मुंतशिर यांनी सांगितले होते.
दरम्यान, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना त्यातच आता काही बदल करण्यात आले आहेत. आता चित्रपटातील हनुमानापासून ते अगदी रावणापर्यंतचे चित्रपटातील संवाद बदलण्यात आल्याचे बोलले जात आहे. "कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका ही, असा नवीन संवाद बदल करण्यात आला आहे.