सायबर फसवणूकीचा नवा डाव! या ७ नव्या ऑफरला बळी पडू नका!, बँक अकाऊंट होईल रिकामे!
03-Apr-2023
Total Views |
मुंबई : देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढ होतं आहे. गेल्या वर्षभरात सायबर क्राईम संबधित https://cybercrime.gov.in/ या वेबसाईटवर २० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि ४० हजार एफआयआर नोंदवण्यात आल्या.यामुळे सर्वसामान्यांनी सतर्क होणे गरजेचे आहे. एकीकडे देशात डिजिटल व्यवहार वाढत आहेत, तर दुसरीकडे डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. येथे आम्ही तुम्हाला 8 प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती देणार आहोत.
१) चित्रपट रेटिंगच्या नावावर घडलेला गुन्हा
गेल्या काही दिवसापुर्वी नोएडामध्ये एका महिलेला चित्रपट रेटिंगच्या नावावर एक मेसेज आला आणि त्यात त्या महिलेला १२ लाख रूपयांचा चुना लागला. या मेसेज मध्ये लिहले होते की, घर बसल्या चित्रपटांना रेटिंग देऊन तुम्ही पैसे कमवू शकता. सायबर गुन्हेगारांनी त्या महिलेला पैसे मिळवण्यासाठी ३० वेळा लिंकवर क्लिक करायला सांगितले आणि महिलेच्या खात्यातील १२ लाख रूपयांना महिलेला गंडा घातला. हे काम देण्यापुर्वी महिलेकडून १० हजार रूपये घेतले होते.
२) क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट
दिल्लीमध्ये राहणाऱ्या राजेशला (नाव बदलेले आहे) एका अज्ञात व्यक्तीने कॅाल केला.आणि स्वतला बॅकेची महिला अधिकारी सांगून क्रेडिट कार्डवर काही रिवॉर्ड पॉइंट आहेत ते तत्काळ रिडीम करायला लागतील नाहीतर ते एक्सपायर होईल असे सांगून एक लिंक राजेशला पाठवली. त्यानंतर राजेशने घाईघाईत त्या लिंक वर आपली सर्व माहिती भरली आणि माहिती सबमिट केली असता. राजेशच्या अकाऊटमधील २१ , ३४१ रूपये कट होतात. त्यानंतर राजेश बॅकेत कॅाल करतो तेव्हा त्याला कळते की आपल्यासोबत सायबर फसवणूक झालेली आहे.
३) वीज बिल होल्ड
नोएडामध्ये राहणाऱ्या पुरन जोशी यांना फोन आला की, तुम्ही वीज बिल भरलेले आहे. तरी तुम्ही जर लवकरात लवकर वीज बिल भरले नाहीतर तुमच्या घरची वीज कट केली जाईल. त्यामुळे पुरन जोशी यांनी वीज बिल भरण्यासाठी चौकशी केली असता. त्यांना एनीडेस्क ऐप डाउनलोड करायला सांगितला आणि त्यानंतर जोशी यांचा फोन हॅक करून त्यांच्या खात्यातील २७ लाख रूपये सायबर गुन्हेगारांने लंपास केले. विषेश म्हणजे ज्या नंबर वरून फोन आला होता त्या नंबरवर वीज वितरण विभागाचा लोगो ही होता.
४) एटीएम ब्लॉक
मध्यप्रदेशातील सागर यांचे एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकले होते. त्यानंतर त्यांनी कस्टमर केयर नंबरवर कॅाल केला असता.सागर यांना आपले कार्ड तिथेच सोडून जावे. सकाळी आमचा इंजिनियर येऊन तुमचे एटीएम कार्ड काढेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॅाल करू, असे कस्टमर केयररकडून सांगण्यात आले. पंरतू काही वेळाने सागर यांच्या खात्यातील ५१ हजार रूपये कट झाले. तेव्हा लक्षात आले की, एटीएम कस्टमर केयर नंबरऐवजी ठगाने स्वतांचा नंबर तिथे लिहून ठेवला होता.
५) वर्क फ्रॉम होम जॉब
फरीदाबाद येथील एका महिलेने एकदा वर्क फ्रॉम होम जॉबची जाहिरात वाचली त्यानंतर तिने खाली दिलेल्या नंबर वर कॅाल केला असता . त्या महिलेकडून सुरूवातीला काही पैसे घेण्यात आले. आणि त्या महिलेचा भरोसा जिंकण्यासाठी सुरूवातीला तिच्या खात्यात काही पैसे ही टाकणयात आले पण नंतर त्या महिलेकडून आणखीन पैसांची मागणी करून सव्वा लाखांना त्या महिलेला गंडवले.
६) पेटीएमद्वारे फसवणूक
दिल्लीमध्ये राहणाऱ्या रूपेश कुमार यांनी OLX वर वॉशिग मशिन विकण्याची जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून एका व्यक्तिने त्यांना फोन केला आणि २ रूपये मी तुमच्या अकाऊटला पाठवतो आहे. तुम्ही ही २ रूपये पाठवून चेक करा पैसे येतात का? त्यावर रूपेश यांनी संबधित व्यक्तिच्या पेटीएमवर सुरूवातीला २ रूपये पाठवले आणि नंतर २० हजार रूपयांचा मागणी केली असता. रूपेश यांनी पैसे पाठवले पंरतू नंतर समोरील व्यक्तिने पैसे परत केले नाही तेव्हा रूपेश यांच्या लक्षात आले की, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे.
७) न्यूड व्हॉट्सअॅप कॉल
देहराडूनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तिला एका अज्ञात नंबर वरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल येतो. ती व्यक्ती व्हिडीओ कॉल उचलते तेव्हा त्याला व्हिडीओ कॉल केलेली तरूणी आपले कपडे व्हिडीओ कॉलवर काढू लागते. तेव्हा तो व्यक्ति व्हिडीओ कट करतो. पंरतू थोड्या वेळाने त्याला एक मॉर्फ केलेला व्हिडिओ येतो त्या व्हिडीओत तो व्यक्ति सुद्धा असतो. त्यानंतर त्या व्यक्तिकडून व्हिडीओ डिलीट करण्यासाठी ३५००० रूपये मागितले जातात. आणि त्या व्यक्तिला १.२१ लाखाचा चुना लागतो.
त्यामुळे वरील सायबर संबधित गुन्ह्याद्वारे तुमची ही फसवणूक होऊ नये यासाठी सतर्क राहा.