मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उत्तर प्रदेशातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या मूळगावी उन्हाळी सुट्टीत जाता यावे याकरिता शिक्षक विशेष ट्रेन सोडण्यात यावी याकरिता रेल्वे प्रशासनाशी दिनांक २०.मार्च पासून पत्रव्यवहार करण्यात आले असून दिनांक २१ एप्रिल रोजी शिक्षक स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
दिनांक २ मे रोजी गाडी क्रमांक ०११०१ ही लोकमान्य टिळक टर्मिनसहून वाराणसीला सोडण्यात येणार असून परतीसाठी गाडी क्रमांक ०११०४ ही वाराणसीहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी ७ मे रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार यासाठी आरक्षण रविवार दिनांक २३ एप्रिल पासून सुरु करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष खिडकीवरुन हे आरक्षण करता येणार आहे. तरी शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केले आहे.