सनातन धर्म महाराष्ट्रद्रोही आहे : जितेंद्र आव्हाड

    03-Mar-2023
Total Views |

(Jitendra Awhad on Sanatan Dharma)
सनातन धर्म महाराष्ट्रद्रोही आहे : जितेंद्र आव्हाड
 
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली. रोजगार वाढविणे, महागाई कमी करणे यावर काम करण्याऐवजी भाजपाकडून इतर मुद्दे उपस्थित केले असल्याचे आव्हाड म्हणाले. शिवाय, त्यांनी "सनातन धर्म महाराष्ट्रद्रोही आहे." असे जाहिरपणे सांगितले.
 
“योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आमचे कर्तव्य आहे”, असे जाहीरपणे सांगितले. या मुद्द्याला हात घालून आव्हाड म्हणाले की, "भाजपाला सनातन धर्म परत आणायचा आहे का?"असा प्रश्न विचारला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन धर्म फेकून देशाला संविधान दिले. त्यांचे संविधान बाजूला सारून पुन्हा एकदा सनातन धर्माच्या माध्यमातून अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था परत आणायची आहे का? सनातन धर्म आम्हाला मान्य नाही. तुमचा माळशिरस हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो मतदारसंघ राखीव झाला, म्हणूनच तुम्ही इथे आलात. सनातन धर्माचे राज्य असते तर तुम्ही त्या मतदारसंघात चाकरी करत असता, आमदार म्हणून निवडून आले नसतात." असे म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.