अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा! २५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना जाहीर होणार मदत
22-Mar-2023
Total Views | 72
10
मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आंवा, काजु, द्राक्ष या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. २५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार. तर, ३१ मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारांनी दिली.
''३१ मे पर्यंत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील. यामध्ये नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ५० लाख शेतकऱ्यांना २३०५ कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे.'' असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.