भाकरी मातोश्रीची अन् चाकरी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची; दादा भुसेंचा राऊतांना इशारा!

    21-Mar-2023
Total Views |
 
dada bhuse
 
 
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री दादा भुसे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावरुन दादा भुसे यांनी आमच्याबर टीका करणारा स्वतःच महागद्दार असल्याचे म्हटले आहे.
 
विधानसभेत बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले, "आमच्या मतांवर निवडून राज्यसभेत गेलेले महागद्दार संजय राऊत यांनी काल माझ्याविरोधात एक चुकीचे ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. माझी विरोधी पक्षनेते आणि सरकारला आव्हान आहे की माझी कुठल्याही संस्थेमार्फत चौकशी करावी.अन्यथा राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, सामनाच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा. हा महागद्दार भाकरी मातोश्रीची खातो अन चाकरी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची करतो. माझ्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे."
 
संजय राऊतांनी माफी मागावी, अन्यथा नाशिकमधील शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. असा थेट इशाराच दादा भुसे यांनी संजय राऊत यांना दिला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121