मुंबई : सुप्रिया सुळे तुम्हाला जळी- स्थळी काष्टी पाषाणी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. अशी जळजळीत टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर केली आहे. सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना, प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जायला वेळ आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. हे सरकारचे अपयश आहे. असे म्हटले होते. यावर उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, "सुप्रियाताई, तुम्हाला सध्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. ज्या देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिले, उच्च न्यायालयात कायम राहिले. पण, तुमच्या महाआघाडीच्या आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या नाकर्तेपणामुळे ते पुढे टिकले नाही. तो विषय आता जुना झाला. काहीही घडले, की देवेंद्रजींचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरला सुरला पक्ष कसा टिकेल, ते पहा. आजच तुमच्या पक्षाचा एक आमदार फुटून दुसऱ्या गटात गेला म्हणे!" असं केशव उपाध्ये म्हणाले.