शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक बघितला का?

दीपक राणे फिल्म्सच्या "आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे"चे तिसरे पोस्टर रिलीज

    29-Aug-2022
Total Views | 47

shivani
 
 
 
मुंबई : दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक एक्शन - रोमँटिक सिनेमा आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या आत्तापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असं म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक आत्तापर्यंत कोणी पाहिला नसेल असा आहे.
 
 
 
मराठी -हिंदी मालिका , मराठी सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर शिवानीचा हा लूक हा थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा, आत्तपर्यंत शिवानीला सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता हा तिचा ग्लॅमरस नसलेला लूक आहे, त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या लूक बद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे.
 
 
 
शिवानी तिच्या या लूकबद्दल सांगते. “आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला. माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती. की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे.”
 
 
 
 
आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी - कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या सिनेमात मराठी - कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी सिनेमात एक्शन - रोमँटिक सिनेमा कमी येतात, त्यात हा सिनेमा वेगळा ठरणार आहे.
 
 
 
दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121