
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका अभ्या आणि लतिकाच्या केमेस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेत एका नव्या स्त्री व्यक्तिरेखेची एन्ट्री होत आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील स्वानंदी टिकेकर हे नवे पात्र साकारताना दिसणार आहे.
मिडीयाला मिळालेल्या सूत्रानुसार स्वानंदी टिकेकरची या मालिकेत एन्ट्री तर होत आहे, पण तिची भूमिका काय असणार आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे. परंतु, मालिकेचा प्रोमो पाहून स्वानंदी अभिमन्यूच्या ऑफिसमध्ये दाखल झालेली दिसून येत आहे. त्यामुळे स्वानंदी, अभिलाषाप्रमाणे एखादे पात्र साकारण आहे का, असे प्रश्न मालिकेचे चाहते विचारत आहेत.
'दिल दोस्ती दुनियादारी' मुळे स्वानंदी टिकेकर घराघरात पोहचली आहे. विशेषतः तिचा तरुण चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. एकदम डॅशिंग मीनल सर्वांनाच तेव्हा आवडली होती. उत्तम अभिनेत्री बरोबरच ती उत्तम गायिका आहे. गाण्याचा वारसा तिला तिची आई प्रख्यात गायिक आरती अंकलीकर याच्याकडूनच मिळाला आहे. तर अभिनयाचा वारसा हा वडील उदय टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. त्यामुळे आता तिला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.